• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानी बॉलरची फेकी गोलंदाजी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज संतापला Video

February 1, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी असलेल्या 20 संघांनी जोरदार तयारी केली आहे. टी20 मालिका आणि सराव सामन्यातून तयारी सुरू आहे. पाकिस्तानचं स्पर्धेत भाग घ्यायचं की नाही हे अजून ठरलेलं नाही. असं असलं तरी पाकिस्तानचा तयारी मात्र सुरू आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा टी20 सामना शिल्लक आहे. पण या सामन्यापूर्वीच पाकिस्तानने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. पण दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर अप्रामाणिकपणाचा ठपका लागला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानी संघात सहभागी असलेल्या फिरकीपटू उस्मान तारिकच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण त्याची शैली एका फेकी गोलंदाजासारखी आहे. कॅमरून ग्रीन बाद झाल्यानंतर त्याने त्याच्या शैलीची कॉपी करत आक्षेप नोंदवला.

टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या वेशीवर पोहोचवण्याचा विडा कॅमरून ग्रीनने हाती घेतला. यासाठी ग्रीन आक्रमक खेोळी करत होता. 11व्या षटकात त्याचा सामना फिरकीपटू उस्मान तारिकशी झाला. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे संभ्रमात पडला. तसेच फटका चुकल्याने चेंडू वर चढला आणि झेलबाद होत तंबूत परतला. यानंतर वादाला फोडणी मिळाली. बाद झाल्यानंतर कॅमरून ग्रीन तंबूत परतत असताना त्याच्या गोलंदाजीचं नक्कल केली. यात चेंडू फेकत असल्याचं त्याने दाखवून दिलं.

Cameron Green after getting out was clearly indicating the straightening of usman tariq arm while bowling. Ffs ICC ban him he is chucking it is clearly against the rules of the game pic.twitter.com/lRwpINfDP9

— Mustafa (@mustafamasood0) January 31, 2026

Usman Tariq has sensationally hit back at Cameron Green after the Australian all-rounder mocked the Pakistani spinner’s action. https://t.co/HCImxpxaFt pic.twitter.com/BLIj8Kh1j0

— Daniel Cherny (@DanielCherny) February 1, 2026

कॅमरून ग्रीनने उस्मान तारीकच्या गोलंदाजी शैलीवर अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर सोशल मीडियावर उस्मान तारिकवर टीकेची झोड उठली आहे. तर काही जणांनी कॅमरून ग्रीनला खडे बोल सुनावले. कॅमरून ग्रीनने आपल्या शैलीची नक्कल केल्याचं उस्मान तारिकला कळलं. तेव्हा त्याने त्याची खिल्ली उडवत इंस्टाग्राम खात्यावर एक स्टोरी शेअर केली. यात एक लहान मुलगा रडत आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिलं की, ‘बाद झाल्यानंतर’. ग्रीनच्या आरोपानंतर उस्मान तारिक संतापल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे द्वंद्व तिसऱ्या सामन्यात अजून तीव्र होणार यात काही शंका नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता 12 दिवसांनी सगळं…दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ!
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…
  • राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
  • प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
  • डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in