• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानात सोनं पाहायलाही मिळेना, भाव एवढा वाढला की दागिने करणं मुश्कील, वाचा भाव काय?

February 7, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव भारतात चांगलाच वाढतो आहे. सोनं कधीच दीड लाखांच्या पुढे गेले आहे. चांदीचा भावही सोन्यापेक्षा जास्त गतीने वाढतो आहे. असे असतानाच आता भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात काय स्थिती आहे ते जाणून घेऊ या…

भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सोने आणि चांदीचा भाव वाढत आहे. पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई याचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. हो दोन्ही धातू चांगलेच भाव खात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

पाकिस्तानात 6 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकावर गेला. तेथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 44,219 ते 45,011 पाकिस्तानी रुपया प्रति ग्रॅमवर पोहोचला. पाकिस्तानात एक तोळा सोन्याचा भाव तब्बल 5,15,000 ते 5,19,000 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानात 22 कॅरेट सोन्याचा भाव 40,534 ते 41,257 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद यासारख्या बड्या शहरांत सोन्याचा भाव साधारण सारखाच आहे. वरील आकडे पाहता पाकिस्तानात सोन्याचा भाव भारताच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे समजते.

पाकिस्तानात गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सोन्याची खरेदी करणे खूप कठीण आहे. सोन्यासोबतच पाकिस्तानात चांदीदेखील महागते आहे. पाकिस्तानात चांदीचा भाव 12,024 रुपये प्रति तोळा आणि 1,031 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅम आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर…
  • महाशिवरात्रीला जलाभिषेक करायचा आहे? हे आहेत शुभ मुहूर्त
  • Sachin Pilgaonkar: वयाच्या 65व्या वर्षीही मला… सचिन पिळगावकर यांचा खळबळजनक दावा
  • टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
  • Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in