• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल

April 11, 2026 by admin Leave a Comment


Serena Hotel Fare: मध्य पूर्वेत इराण युद्धाने दीर्घकाळ तणाव सुरु असताना अमेरिका आणि इराणच्या दरम्यान शांतता बैठक सुरु आहे.या महत्वपूर्ण बैठकीसाठी पाकिस्तानची राजधानीतील एका लक्झरी हॉटेलची निवड केली आहे. हे हॉटेल केवल व्हिआयपी पाहुण्यांच्या पाहुणचाराची जागा नसून हाय प्रोफाईल मिटींगसाठी ओळखले जाते.
त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. ज्या हॉटेलात दोन्ही देशांचे शिष्ठमंडळ उतरले आहे.तेथील एक रात्रीचे भाडे किती आहे. आणि पाहुण्यांना कोणत्या सुविधा मिळतात. चला तर पाहूयात काय सुविधा येथे आहेत.

अमेरिका आणि इराणच्या शिष्ठमंडळात होणाऱ्या चर्चेसाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील प्रसिद्ध सेरेना हॉटेलची निवड करण्यात आली आहे. हे हॉटेल देशातील प्रमुख लक्झरी ५ – स्टार हॉटेलपैकी एक आहे. दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय बैठका आणि हायप्रोफाईल पाहुण्यांचे स्वागत आणि ऊठबस करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

सेरेना हॉटेलची सुरुवात ११ मार्च २००२ मध्ये झाली होती. याचे उद्घाटन त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली होती. या हॉटेलचा मालकी हक्क आगा खान फंड फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंटजवळ आहे. तर या हॉटेलचे संचलन त्याची सहायक कंपनी टुरिझ्म प्रमोशन सर्व्हीस द्वारे केले जाते.

Serena Hotel चे भाडे किती ?

जर भाड्याचा विचार कराल तर बातमीनुसार सेरेना हॉटेलच्या डिलस्क रुमची किंमत सुमारे १४३ डॉलर म्हणजे सुमारे १३ हजार रुपयांनी सुरु होते. जी अनेकदा १५० ते २०० डॉलरपर्यंत पोहचते. तर एक्झुकेटिव्ह रुमचे भाडे २०० ते २५० डॉलर म्हणजे सुमारे २३ हजार रुपयांपर्यंत असते. सर्वात महागड्या प्रेसिडेन्शियल सुईटचे भाडे सुमारे १००० डॉलर म्हणजे जवळपास ९३ हजार रुपये प्रति रात्र पर्यंत जाते. या हॉटेलचे डिझाईन प्रसिद्ध आर्किटेक्ट नय्यर अली दादा यांनी केले आहे. ज्यात पारंपारिक पाकिस्तानी कलेसोबत मुगल आणि मुरिश शैलीची झलक पाहायला मिळते. ग्रीन मार्बल, लाकडाचे छत आणि खास प्रकारच्या फॅब्रिकच्या सजावटीने हे हॉटेल राजेशाही दिसते.

होटल बांधायला २७० कोटी रुपये खर्च

सुमारे २७० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे हॉटेल १४ एकरवर पसरलेल्या एका सुंदर बगिच्यात आहे. शहराच्या मधोमध असल्याने आजूबाजूला मार्गल्ला हिल्स आणि राव सरोवर अशी आकर्षक ठिकाणे आहेत. या हॉटेलच्या अनेक रुममधून डोंगराचे नयनरम्य दर्शन होते. त्यामुळे हे हॉटेल आणखीन सुंदर वाटते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?
  • सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत
  • मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
  • IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस
  • समुद्रात वादळ आलं अन् लागला जगाला थक्क करणारा शोध, समोरचं दृश्य बघून…संशोधकही थक्क!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in