• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानचा इराणसोबत डबल गेम तर नाही ना ? सौदीत अरबमधल्या कृतीने संशयाला बळ

April 11, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यात संरक्षण सहकार्य मजबूत करत असताना आता पाकिस्तानने त्यांच्या सैन्य दलांना सौदी अरबमध्ये तैनात केले आहे. सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सैन्य दल आणि सहायक विमानांसह पाकिस्तानी आर्मीचे जवान शनिवारी किंग अब्दुलअजीज एअर बेसला पोहचले आहेत. हा तोच एअरबेस आहे ज्यावर इराणसोबतच्या युद्धात अनेक वेळा ड्रोन आणि मिसाईल हल्ले झाले होते. सध्या इराणचे एक शिष्ठमंडळ अमेरिकन प्रतिनिधी मंडळासोबत सीजफायरवर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादला पोहचले असताना पाकिस्तानने सौदीत आपली आर्मी तैनात केल्याने पाकिस्तान इराण सोबत डबल गेम तर खेळत नाही ना असा सवाल केला जात आहे.

सप्टेंबरात दोन्ही देशात करार

या सैन्य तैनाती मागे दोन्ही देशात समन्वय वाढवणे आणि क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा आणि स्थिरतेला मजबूत करणे आहे असे सौदी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशात एक संरक्षण करार करण्यात आला होता. त्यानुसार कोणाही एका देशावर हल्ला झाला तर तो हल्ला दोन्ही देशांवरचा मानला जाईल. इराणने अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान सौदी अरब देखील हल्ले केले होते, त्यात सौदी अरबला मोठे नुकसान झाले होते. आता एकीकडे शांततेसाठी बैठका घेत असताना दुसरीकडे पाकिस्तानने सौदीत सैन्य तैनात केल्याने अनेक लोकांना पाकिस्तानची वागण्यावर संशय व्यक्त होत आहे.

इराण आणि अमेरिकन वादात अनेक देश मध्यस्थ

इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान सुरु असलेल्या महत्वाच्या शांतता बैठकीत चर्चेला सुरुवात झाली आहे. येथील सूत्रांच्या माहितीनुसार इजिप्त, सौदी अरब, चीन आणि कतारचे अधिकारी देखील पाकिस्तानातील या बैठकीला उपस्थित आहेत. आणि या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. इराणच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागैर गालिबफ करीत आहेत. शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट मोहम्मद बागैर गालिबफ यांनी घेतली आहे.या बैठकीबद्दल इराणी पक्षाने किंवा पंतप्रधान कार्यालय दोन्हीही अधिकृत टिपण्णी केलेली नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान
  • 1.99 लाखांत ‘Flying Flea C6’ EV बाईकचा धमाका, खरेदीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी वाचा
  • त्या’ किल्ल्यात खजिना खरंच नव्हता? मग दिल्ली-जयपूर हायवे रात्रभर बंद का होता? ट्रकमध्ये काय वाहून नेलं
  • Iran | भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
  • Chanakya Niti : चाणक्यांचा या पाच गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात कोणीच तुमचा पराभव करू शकणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in