• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पहिल्या नवऱ्याने जबडा तोडला… तिसऱ्याने केली बळजबरी… वयाच्या 59 व्या वर्षी तिसरं लग्न अभिनेत्रीला पडलं महागात

March 15, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे, जिने एक दोन नाही तर, तीन लग्न केली. पण तिन्हा लग्नात अभिनेत्रीला अधिक काळ वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. अभिनेत्रीचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या लग्नात अभिनेत्रीने तब्बल 12 वर्ष त्रास सहन केला… तर वयाच्या 59 व्या वर्षी तिसरं लग्न करणं अभिनेत्री महागात पडलं… सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, दिग्गज अभिनेत्री झीनत अमान आहेत.

झीनत यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक सिनेमे दिले. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांचं भाग्य काही चांगलं नव्हतं… झीनत यांनी पहिलं लग्न 1978 मध्ये केलं. ‘अब्दुल्ला’ सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. तेव्हा संजय आणि झीनत एकमेकांच्या प्रचंड जवळ आले. पण संजय खान तेव्हा 2 मुलांचे वडील होतं. असं असताना देखील खान यांनी झीनत यांच्यासोबत संबंध ठेवले आणि लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर खान यांनी झीनत यांच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.

संजय खान याने अभिनेत्रीला इतकं मारलं की, अभिनेत्रीचा जबडा तोडला. त्यानंतर झीनत आणि संजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही, अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…. त्यानंतर एका वर्षानंतर झीनत आणि संजय यांचा घटस्फोट झाला.

झीनत यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1985 मध्ये झीनत यांनी मजहर खान यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. मजहर यांचा देखील घटस्फोट झालेला होता… तेव्हा झीनत करियरच्या उच्च शिखरावर होत्या, तर मजहर सिनेमांमध्ये लहान भूमिका साकारत होते. झीनत यांनी दुसरं लग्न फक्त आई होण्यासाठी केलं होतं. लग्नाचे सुरुवातीचे काही वर्ष चांगले होते. पण त्यानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली.

झीनत यांनी दोन मुलांना जन्म दिला आणि मजहर यांनी आपल्या पत्नीचं यश पाहवत नव्हतं… अशात लग्नाच्या 12 वर्षांनंतर झीनत यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण 1998 मध्ये मजहर यांचं निधन झालं, अशात पतीच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेल्या झीनत यांनी सासरच्या मंडळींनी घरात देखील घेतलं नाही. शिवाय पतीचं अंतिम दर्शन देखील करु दिलं नाही.

झीनत यांचं तिसरं लग्न

दुसऱ्या पतीच्या निधनानंतर झीनत यांनी 2012 मध्ये तिसरं लग्न केलं, अमन खन्ना उर्फ सर्फराज याच्यासोबत तिसरं लग्न केलं. वयाच्या 59 व्या वर्षी झीनत यांनी 33 वर्षीय झीनत याच्यासोबत लग्न केलं. पण तिसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. झीनत यांना सर्फराज याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि अनेक गंभीर आरोप केले… त्यानंतर पोलिसांनी सर्फराज याला अटक केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in