
अभिनेत्री पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. पारंपरिक लूकमध्ये पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
सिंपल मेकअप, टिकली, लांब कानातले, हातात बांगड्या आणि मोकळ्या केसांमध्ये पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. पलक कायम चाहत्यांना वेगवेगळ्या लूकमध्ये फॅशन गोल्स देत असते.
पलक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण अभिनेत्रीला अद्याप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही.
पलक तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. पलक अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.




Leave a Reply