• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पर्यटनात किंग असलेला हा देश काळी मिरीच्या उत्पन्नात सर्वात पुढे, भारताचा कितवा नंबर ?

April 6, 2026 by admin Leave a Comment


काळी मिरीला हिंदी भाषिक काळी मिरची म्हणतात. मिरची नसेल तर काळी मिरी जेवणात त्या ऐवजी वापरतात. आपल्या भारतातही काळी मिरीचे मोठे उत्पन्न होते. भारतात पुरातन काळापासून युरोपात काळी मिरीचा व्यापार केला जात आहे.

भारतात काळी मिरीचा दर एक हजार रुपये प्रति किलो आहे. काळी मिरीचे उत्पन्न तेथे जास्त होते जेथे उष्ण तापमानासोबत नियमित पाऊसही पडत असतो. महाग किंमतीमुळे काळी मिरीची नेहमीच चर्चा असते.

व्हिएतनामला काळी मिरीचा गड म्हटले जाते. हा देश जगात सर्वाधिक काळी मिरीचा पुरवठादार म्हणून ओळखला जातो. अनुकूल हवामान, सुपिक माती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे व्हिएतनाम काळी मिरीच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. व्हिएतनाम अमेरिका, युरोपासह आशियाई देशांना काळी मिरी विकतो.

काळी मिरीचे उत्पादन अन्य देश देखील घेतात. त्यात व्हिएतनाम नंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. ब्राझील नंतर तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशियाचा नंबर लागतो. येथील तापमान काळी मिरीला पोषक आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो.

भारतानंतर पाचव्या क्रमांकावर चीनचा नंबर लागतो. चीनमध्येही काळी मिरीची शेती मोठ्या प्रमाणावर होत असते. तेथील अर्थव्यवस्थेला काळी मिरीमुळे फायदा होतो.

व्हिएतनाम दरवर्षी 270,000 मेट्रिक टन काळी मिरीचे उत्पादन घेतो. या देशाने काळी मिरीसाठी मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यामुळे उत्पादन अनेक पटीने वाढले आहे.मोठ्या प्रमाणावर लागवड आणि हार्वेस्टिंगच्या पद्धतीने व्हिएतनाम याच्या शेतीत नंबर वन झाले आहे.

भारतात पुरातन काळापासून युरोप आणि मध्य पूर्वेत काळी मिरी निर्यात करत आला आहे. व्यापारी भारतीय बंदरात काळी मिरी खरेदी करण्यासाठी मोठा दूरचा प्रवास करुन यायचे. त्यामुळे काळी मिरी व्यापारात सर्वात मुल्यवान मसाल्यापैकी एक आहे.

काळी मिरीचा वापर सूप, करी आणि सॉसमध्ये मसाल्याच्या रुपात केला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांचा स्वाद काळी मिरी वाढवते. जेवणाशिवाय पचना संबंधित पारंपारिक औषधात काळी मिरी वापरली जाते. हिच्या खास वैशिष्ट्यांमुळे काळी मिरीला जगभरात मागणी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
  • 747 कोटी बजेट अन् चित्रपट ठरला फ्लॉप, OTT वर येताच बनला धुरंधर, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, कथा ठरतेय सुपरहिट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in