• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पतंजलीचे इम्युनोचार्ज कसे काम करते ? रामदेव बाबांकडून जाणून घ्या…

February 24, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात बदलती जीवनशैली, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांची रोगप्रतिकारक कमी होते. कमजोर इम्युनिटीमुळे वारंवार सर्दी – खोकला, थकवा, संक्रमण आणि कमजोरी जाणवू लागते.अपुरी झोप, पोषणाची कमतरता, जास्त तणाव, प्रदुषण आणि शारीरिक एक्टीव्हीटीच्या कमतरतेमुळे तुमच्या इम्युनिटीवर परिणाम होतो. अनेक जण इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पर्याय शोधत असतात. रामदेव बाबा यांचे पंतजली इम्युनोचार्ज एक असे आयुर्वेदिक उत्पादन आहे ज्यामुळे इम्युनिटीला वाढवते.

पतंजली इम्युनोचार्ज इम्युनिटी कशी वाढवते ?

पतंजली इम्युनोचार्जमध्ये अनेक आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो, ज्यांचा वापर इम्युनिटी वाढवण्यास केला जातो, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे. यात गिलोय – गुळवेल , आवळा, अश्वगंधा, तुळस आणि हळद सारखे घटक असतात. गुळवेल ही इम्युनिटी मजबूत करणे आणि संक्रमणात लढण्यास मदत करते. आवळ्यात व्हिटामिन्स सी असते, जे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला मजबूत करत असते.

अश्वगंधा तणाव कमी करणे आणि शरीराला एनर्जी देण्यास मदत करते.तर तुळस आणि हळद ही एंटीऑक्सीडेंट गुणांसाठी ओळखली जाते. हे सर्व तत्व मिळून शरीराला आतून मजबूत करणे, थकवा कमी करणे आणि आजारांपासून रक्षण करणे यासाठी कामी येतात. नियमितपणे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने इम्युनिटी सपोर्टसाठी मदत होते. पंतजली इम्युनोचार्जचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कोणतेही औषध घेऊ नये.

या गोष्टींनीही वाढते इम्यूनिटी

इम्युनिटी वाढवण्यासाठी केवळ सप्लीमेंटवर अवलंबून राहणे पुरेसे नाही.रोज डाएटमध्ये भाज्या, मोसमी फळे, सुखा मेवा आणि पुरेसे प्रोटीनचा समावेश करावा. पाणी पिणे, हळदीचे दूध आणि तुळस-आल्याचा चहा देखील फायदा होतो.

जंक फूड आणि जास्त गोड असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. शरीरास हायड्रेट राखणे देखील इम्युनिटीसाठी गरजेचे असते.
चांगल्या सवयी

मजबूत इम्युनिटीसाठी हेल्दी सवयींचा अंगिकार करणे गरजेचे आहे. रोज पुरेशी झोप घेणे आणि तणावापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करावा, नियमित योग,प्राणायाम, आणि हलका व्यायाम केल्यायने शरीर एक्टीव्ह राहाते.

धूम्रपान आणि मद्यापासून चार हात लांब रहावे, वेळोवेळी आपल्या शरीराचे चेकअप करावे आणि संतुलित दिनचर्या स्वीकारल्याने इम्युनिटी दीर्घकाळापर्यंत चांगली मजबूत होण्यास मदत होते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in