
आजकाल वाढते प्रदुषण तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर त्वचेच्या आणि केसांच्या देखील समस्या अनेकांना सतावत असतात. त्यामुळे अनेकजण आता घरगूती उपाय करण्यावर जास्त भर देत आहेत. यातच योगगुरू बाबा रामदेव यांच्यामते केस गळती विविध आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकते. किडनी किंवा लिवरचे खराब आरोग्य केस आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकते. त्वचा निस्तेज दिसू लागते, तर स्कॅल्पवरील कोरडेपणा केस गळतीस कारणीभुत ठरू शकतात. बाबा रामदेव यांच्या मते या समस्येवर सर्वोत्तम उपचार आयुर्वेदात आहे. केस गळती रोखण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. तर आजच्या या लेखात केस गळती रोखण्यासाठी रामदेव बाबा यांनी सुचवलेल्या आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊयात.
विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करणे खूप सोपे आहे. तर हे आयुर्वेदिक उपाय असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही. ज्यांना केस गळतीचा त्रास होत आहे त्यांनी ही समस्या कशी कमी करावी ते जाणून घेऊयात.
केस का गळतात?
बाबा रामदेव सांगतात की जर एखाद्याचे केस खूप जास्त गळत असतील तर त्यामागील मुख्य कारणे आहार आणि अनहेल्दी जीवनशैली आहे. ताणतणाव देखील याला कारणीभूत ठरू शकतो. दिवसाला 50 ते 100 केस गळणे सामान्य आहे, परंतु जर ते यापेक्षा जास्त असेल तर ही गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
असे मानले जाते की केस गळणे हे हार्मोनल असंतुलनामुळे होते. पुरुषांमध्ये, डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन केसांच्या कूपांना आकुंचन पावते, मुळे कमकुवत होतात आणि केस पातळ होतात. महिलांमध्ये रजोनिवृत्ती, पीसीओएस आणि गर्भधारणेनंतर हे होऊ शकते, पौष्टिक कमतरतेमुळे केस गळू शकतात. परंतु पुन्हा केस मजबूतरित्या वाढवणे देखील शक्य आहे. केसांसाठी कॅरोटीन नावाचे प्रथिन आवश्यक आहे. जर ही कमतरता कायम राहिली तर केस गळण्याची गती वाढू शकते.
बाबा रामदेव यांनी सुचवलेले हे खास उपाय
तुमचे केस नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी नखे एकमेकांवर घासण्याचा सल्ला रामदेव बाबांनी दिला आहे. त्यांच्या मते, लोहाच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि केस गळू शकतात. बाबा रामदेव यांनी असेही सांगितले की सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता देखील केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. तर यावेळी ही कमतरता भरून काढण्यासाठी पुरेशा प्रमाणात दुधीचा रस प्यावा. रसात आवळ्याचा रस मिक्स केल्यानेकेसांना दुप्पट फायदा होईल.
त्याचबरोबर तुम्ही सकाळी दुधी भोपळ्याचा आणि आवळ्याचा रस पिऊ शकता. या रसात तुम्ही कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रामदेव यांच्या मते, ज्यांना आम्लपित्त आहे त्यांनी लिंबाचा रस मिक्स करू नये.
आवळा केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. निरोगी केस राखण्यासाठी, तुम्ही आवळा कँडीचे सेवन करू शकता. तसेच आवळ्याचा रस देखील पिऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply