• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाहीतर चौथ्या नंबरवर…; सरवणकरांच्या आरोपांवर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, पोस्ट चर्चेत

January 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. दादर-माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. भाजपच्या एका टोळीने पक्षाचा आदेश डावलून मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली, असा खळबळजनक आरोप समाधान सरवणकर यांनी केला. आता यावर भाजपचे पदाधिकारी जितेंद्र राऊत यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.

भाजपचे मुंबई सेक्रेटरी जितेंद्र राऊत यांनी नुकतंच फेसबुकवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी समाधान सरवणकर यांना खडे बोल सुनावले आहेत. भाजपची मते नसती तर चौथ्या क्रमांकावर असता, असे जितेंद्र राऊत यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच 191 192 194 भाजपा लढली असती तर नगरसेवक भाजपाचे असते, असेही त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जितेंद्र राऊत यांच्या या पोस्टमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

समाधान सरवणकरांचा आरोप काय?

माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. सर्वांचे मुख्य टार्गेट मीच होतो. मतदार माझ्यासोबत होते. पण भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासला. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअँप मेसेज करून सरवणकरांना मदत करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते. आपल्याला वरून काहीतरी आलेले आहे असे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला.

भाजपचा अधिकृत लेबल असल्याने कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्याचे ऐकले. त्यामुळे आम्हाला मिळणारी मदत जाणीवपूर्वक रोखण्यात आली. हा प्रकार केवळ महापालिकेपूरता मर्यादित नसून लोकसभेपासून हे सर्व सुरु आहे. लोकसभेत शीतल गंभीर यांचा पराभव कसा होईल, यासाठी हीच भाजपची टोळी सक्रिय होती. तरीही गंभीर यांनी विजय मिळवला. त्यानंतर प्रिया सरवणकर यांनाही लक्ष्य करण्यात आले. ही विशिष्ट मंडळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बोलत होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून स्थानिक पातळीवर झालेल्या गद्दारीचा परिणाम आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, असेही समाधान सरवणकर म्हणाले.

दरम्यान प्रभादेवी-वरळी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत वॉर्ड १९४ मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून समाधान सरवणकर यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. या वॉर्डमधून ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी झाले. यानंतर आता समाधान सरवणकरांनी हे गंभीर आरोप केले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? जर तुमचा पगार 30 हजार असेल तर एका वर्षात किती रक्कम मिळेल? वाचा…
  • मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
  • घृणास्पद, द्वेष अन् हिंसा..; ‘धुरंधर’वर ‘धडक 2’च्या दिग्दर्शिकेनं साधला निशाणा
  • GK : आईस्क्रीमचा शोध नेमका कधी लागला? इतिहास वाचून वाटेल आश्चर्य!
  • जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in