• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नशिब असावं तर असं..! हर्षित राणा जखमी होताच या खेळाडूचे तारे चमकले, थेट संघात मिळाली एन्ट्री

February 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली होती. या दुखापतीतून दोन्ही खेळाडू सावरले असून संघात परतले आहे. मात्र सर्व काही ठीक असताना टीम इंडियाला हर्षित राणाच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे या स्पर्धेला मुकला असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हर्षितचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता हर्षित राणाची संघातील जागा कोण घेणार? याची उत्सुकता रंगली आहे. रिपोर्टनुसार, हर्षित राणाची जागा घेण्यासाठी बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला त्याच्या जागी निवडल्याची चर्चा आहे. हर्षित जागा मोहम्मद सिराज घेईल.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अनुभव वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला हर्षित राणाच्या जागी संघात निवडलं आहे. पण याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत असं काही सांगण्यात आलेलं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं होतं की हर्षित स्पर्धेतून बाहेर गेलेला नाही. पण त्याची स्थिती खूप काही चांगली नाही. त्यामुळे या स्पर्धेला मुकणार हे क्रीडाप्रेमींनी आधीच गृहीत धरलं आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराज दीड वर्षानंतर टीम इंडियाकडून टी20 संघात खेळणार आहे. गेल्या दीड वर्षापासून त्याला संघात काही स्थान मिळालं नव्हतं. त्याने शेवटचा टी20 सामना जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळला होता. पण कसोटी आणि वनडे संघात मात्र खेळत आहेत.

मोहम्मद सिराजने भारतासाठी 16 टी20 सामने खेळले असून त्यात त्याने 14 विकेट घेतल्या आहे. इतकंच काय तर 8 पेक्षा कमी इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहे. आता मोहम्मद सिराजला हर्षित राणाच्या जागी संघात स्थान मिळालं तरी प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही हे सांगता येणार आहे. कारण भारताकडे आधीच तीन वेगवान गोलंदाज आहे. हार्दिक पांड्याची जागा तर पक्की आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह सुद्धा या स्पर्धेतील सर्व सामन्यात खेळणार हे दिसत आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजला संधी मिळाली तर प्लेइंग 11 मध्ये खेळवणं फारच कठीण दिसत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in