• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवे सुप्रीम लीडर मोजताबा यांचा पदभारानंतर अमेरिकेला पहिलाच मोठा इशारा, म्हणाले शहीदांच्या रक्ताचा सूड…

March 13, 2026 by admin Leave a Comment


इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता युद्धाची सुत्रे हाती घेतली आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्राईलला सज्जड इशारा देत होर्मुज सामुद्रधुनी बंदच राहाणार असे म्हटले आहे. इराण प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूचा बदला घेईल. आम्ही कोणाच्याही हौतात्म्याला विसरलेलो नाही. इराणी लोकांच्या खूनाचा बदला घेऊ, आम्ही प्रत्येक मुलाच्या मृत्यूचा बदला घेऊ. शेजारील देशांनाही त्यांनी इशारा देत त्यांनी अमेरिकेची मदत करु नये असे म्हटले. आम्ही मध्य पूर्वेच्या सर्व युएस बेसवर हल्ले करु असेही मोजाताबा यांनी म्हटले आहे.

आम्ही शहीदांच्या खासकरुन मिनाबच्या शहीदांच्या रक्ताचा सूड जरुर घेणार असे इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी इराणच्या सैन्याचे कौतूकही केले. मोजताबा पुढे म्हणाले की इराणचे सैन्य मोठ्या धैर्याने देशाचे संरक्षण करत आहे आणि शत्रूंच्या हल्ल्याला उत्तर देत आहे. इस्राईली आणि अमेरिकेच्या हल्ल्याचे शिकार झालेल्या जनतेला संबोधित करताना त्यांनी त्यांच्या संयमासाठी आशीर्वाद मागितले. तसेच प्रत्येक इराणी शहीदाच्या रक्ताचा बदला घेतला जाईल असेही त्यांनी आश्वस्थ केले.

आम्ही शेजाऱ्यांवर नाही तर US बेसवर हल्ले केले

इराणला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, इराणने शेजाऱ्यांच्या नागरिकांवर हल्ले केले नाही तर अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत कारण शत्रू तेथून इराणवर हल्ले करत होता. आम्ही शत्रूंकडून नुकसानाची भरपाई देखील करु असेही मोजताबा खामेनी म्हणाले.

जर ‘हे’ शक्य झाले नाही शत्रूला नष्ट करु

जर शत्रूने नुकसानाची भरपाई केली नाही तर आम्ही गरज वाटेल तेवढी त्याच्या प्रॉपर्टीवर कब्जा करु, जर हे शक्य झाले नाही तर शत्रूची तेवढी प्रॉपर्टी आम्ही नष्ट करु असेही मोजताबा खामेनी यांनी म्हटले आहे. त्यांनी रेजिस्टेन्स फ्रंटच्या मुलांचेही आभार मानले आणि म्हणाले की आम्ही रेजिस्टेन्स फ्रंटच्या देशाना आपला सर्वात चांगला मित्र मानत आहोत.

अडचणीत असूनही हेजबोल्लाह मदत करत आहे

ते म्हणाले की कुर्बानी देणारा हेजबोल्लाह अनंत अडचणीतही इराणच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बहादूर इराकी रेजिस्टेन्सने देखील ठाम इराद्याने त्याच मार्गावर चालणे पसंद केले आहे. अमेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयातुल्ला अली खामेनी यांच्या सहकाऱ्यांसह त्यांची हत्या झाली. त्यानंतर वारसदार म्हणून त्यांचा पूत्र मोजाताबा खामेनी यांनी सूत्र सांभाळल्यानंतर पहिलेच वक्तव्य करीत मोठी लढाई लढण्याचा इरादा व्यक्त केला आहे. मात्र, ते कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत. त्यांचे निवेदन इराणच्या सरकारी दुरचित्रवाणीवरुन प्रक्षेपित केले गेले.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in