• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवरा भांडतच नाही, हनिमुनला म्हातारी आली, घटस्फोटाची सर्वात अजब कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

February 4, 2026 by admin Leave a Comment


लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो, कारण दोघांना संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढायचे असते. मात्र जोडीदाराची निवड चुकली की नात्यात दुरावा निर्माण होतो. लग्नानंतर नवरा बायकोमध्ये मतभेत निर्माण झाल्यास अनेक जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. मात्र काहीवेळा छोट्या आणि शुल्लक कारणांमुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला शुल्लक कारणांमुळे झालेल्या घटस्फोटांची माहिती देणार आहोत. याची कारणे वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

केस गळत असल्याने पतीने पत्नीला दिला घटस्फोट

चीनमधून घटस्फोटाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हेनान प्रांतातील शांगकीउ शहरातील 36 वर्षीय ली या महिलेल्या तिच्या पतीने 16 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट दिला. याचे कारण म्हणजे तिचे केस गळत होते. तिने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. केस गळतीमुळे माझ्या डोक्यावरील त्वचारोगाचे डाग दिसू लागल्याने तिच्या पतीने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

स्ट्रॉबेरीमुळे घटस्फोट

सोशल मीडियावर स्ट्रॉबेरीमुळे घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. रेडिटवर एका युजरने लिहीले की, आजीने आजोबाला एका स्ट्रॉबेरीमुळे घटस्फोट दिला. कारण फक्त एवढेच होते की, आजीने स्ट्रॉबेरीचे झाड प्रेमाने लावले होते आणि ते वाढवले होते. या झाडाची स्ट्रॉबेरी तिच्या पतीने तोडली आणि खाल्ली, यामुळे आजीने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

पत्नी फक्त इन्स्टंट नूडल्स बनवायची म्हणून…

कर्नाटकातील बल्लारीतून घटस्फोटाचे एक अनोखे कारण समोर आले आहे. एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला कारण, ती त्याला दररोज इन्स्टंट नूडल्स शिजवून खायला देत असे. त्या पुरुषाने असा दावा केला की तिला योग्यरित्या नूडल्स कसे शिजवायचे ते माहिती नाही. दररोज नूडल्स खायला लागत असल्यामुळे या व्यक्तीने न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. कालांतराने दोघांचा घटस्फोट झाला.

पती भांडत नाही म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका महिलेने घटस्फोटासाठी एक धक्कादायक कारण सांगितले. लग्नाच्या 18 महिन्यांनंतर एका महिलेने तिच्या पतीकडून घटस्फोट मागितला. घटस्फोटाचे कारण सांगताना या महिलेना म्हटले की, माझा पती माझ्यावर खूप प्रेम करतो, तो कधीही माझ्याशी भांडत नाही. मी चुका केल्या तरी तो मला माफ करतो. अशा वातावरणात मला गुदमरल्यासारखे वाटते. मला असे वाटत होते की त्याने माझ्याशी वाद घालावा, मात्र तो वाद घालत नसल्यामुळे मला घटस्फोट हवा आहे. शरिया न्यायालयातील धर्मगुरूंनी हे कारण ऐकले मात्र त्यांनी घटस्फोटाला परवानगी दिली नाही.

पतीने त्याच्या आईला हनिमूनला आणले म्हणून

इटलीतील ब्युटीशियन मारियानाने लग्नानंतर अवघ्या एक महिन्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. याचे कारण असे की, दोघे हनिमूनला गेले होते, मात्र त्याचवेळी तिच्या पतीने त्याच्या आईलाही सोबत आणले होते. पतीने त्याच्या आईसाठी ते दोघे मुक्कामी असलेल्या रूमशेजारी एक रूम बुक केली होता, मात्र यामुळे मारियानाला राग आला आणि तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in