• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर 2’मधील बडे साहब कोण? इंडस्ट्रीतल्या मोठ्या नावाची चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

February 4, 2026 by admin Leave a Comment


‘बाहुबली’चा पहिला भाग पाहिल्यानंतर जसं प्रेक्षकांना ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ हा प्रश्न सतावत होता, तसंच आता ‘धुरंधर’ पाहिलेल्या प्रेक्षकांना ‘बडे साहब आहे तरी कोण?’ हा प्रश्न सतावत आहे. ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत या चित्रपटातील काही महत्त्वांच्या दृश्यांचं शूटिंग सुरू आहे. याच शूटिंगदरम्यानचा सेटवरील एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जो सुपरस्टार दिसतोय, तोच बडे साहब असल्याची जोरदार चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल!

‘धुरंधर : द रेव्हेंज’ हा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक दमदार, जबरदस्त बनवण्यासाठी निर्माते बरेच प्रयत्न करत आहेत. 19 मार्च 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असला तरी त्याच्या प्रॉडक्शनचं काम अजूनही सुरू आहे. मुंबईत याचं शूटिंग सुरू असून सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता सलमान खान हा संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबत दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Chronicle (@bollywoodchronicle)

काही रिपोर्ट्सनुसार, सलमान खान ‘धुरंधर 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. या फोटोमध्ये तो एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेतील संजय दत्त आणि मेजर इक्बालच्या भूमिकेतील अर्जुन रामपालसोबत दिसत आहे. काहींना हा फोटो एआय जनरेटेड किंवा मॉर्फ्ड असल्याचंही वाटतंय. तर सलमानने आदित्य धरच्या चित्रपटासाठी खरंच शूटिंग केल्याचं काही जण म्हणत आहेत. या फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे, याबद्दल अद्याप चित्रपटाच्या टीमकडून किंवा सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. सलमान खान यामध्ये बडे साहबची भूमिका साकारणार असल्याचाही अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. सलमानच्या आधी इमरान हाश्मी आणि अजय देवगण यांच्याही नावाची चर्चा होती. ‘आता खरी मजा येणार’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर ‘हा फोटो एआय जनरेटेड आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सलमान या भूमिकेसाठी बेस्ट आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिल आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Netflix India Slate 2026 : नेटफ्लिक्सची मोठी घोषणा, या वर्षाचं 2026 कॅलेंडर जाहीर, तुमची आवडती वेब सीरीज, फिल्म कधी येणार ते पहा
  • पाकिस्तानला मोठा दणका, 40 टक्के भूभाग हातातून निसटला? संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेमध्ये कबुली
  • ‘ही’ कार नव्हे मूव्हिंग थिएटर, ही विशेष प्रणाली काय आहे? जाणून घ्या
  • रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला
  • नवरा भांडतच नाही, हनिमुनला म्हातारी आली, घटस्फोटाची सर्वात अजब कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in