
पतीच्या यशाचं पत्नीने कौतुक करावं आणि पत्नीच्या कामगिरीवर पतीने पाठ थोपटावी.. ही माफक अपेक्षा असण्यात गैर काही नाही. परंतु हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यामागचं कारण म्हणजे रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांबाबत दीपिका पादुकोणने बाळगलेलं मौन. एकीकडे रणवीर प्रत्येक मुलाखतींमध्ये, सोशल मीडियाद्वारे दीपिकावर सतत प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करतान दिसून येतो, तर दुसरीकडे दीपिका मात्र याबाबत संकोचलेपणा करताना दिसून येत आहे. त्याहीपेक्षी नवल वाटण्यामागचं कारण म्हणजे अख्खं जग रणवीरच्या या चित्रपटांचं आणि त्यातील त्याच्या अप्रतिम अभिनयकौशल्याची प्रशंसा करत असताना दीपिकाने जाहीररित्या एक तरी पोस्ट किंवा कमेंट का लिहिली नाही. यावरून विविध मतमतांतरे व्यक्त होत असताना अखेर दीपिकाने तिला ट्रोल करणाऱ्या एका व्हिडीओवर कमेंट करण्याचं कष्ट घेतलं. आता तिच्या या प्रतिक्रियेवरून एका अभिनेत्रीने तिच्यावर टीका केली आहे.
रणवीर किंवा ‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल मौन बाळगलेल्या दीपिकाला एका व्हिडीओतून लक्ष्य करण्यात आलं होतं. ‘दीपिकाने 500 कोटी बजेट असलेल्या चित्रपटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जिथे ‘धुरंधर 2’ने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत, तिथे दीपिका चित्रपटाच्या प्रीमियरला सुद्धा पोहोचली नव्हती. याउलट ती सासरच्या मंडळींसोबत सितारच्या कॉन्सर्टला गेली होती. तिने कोणतीच पोस्ट लिहिली नाही, कसलंही कौतुक केलं नाही. फक्त मौन बाळगलं आहे. इंटरनेटवर सुरू असलेल्या ड्रामापासून ती वाचण्याचा प्रयत्न करतेय का,’ असा सवाल या व्हिडीओत करण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपिकाने मोजक्या शब्दांत लिहिलं, ‘जे शेवटी म्हटलंस, तेच मित्रा. मी हा चित्रपट तुम्हा सर्वांच्या खूप आधीच पाहिला आहे. आता सांगा हा विनोद कोणावर आहे?’
Dear Deepika
This isn’t a flex!
We are still waiting for you to openly praise your husband. I don’t understand why you are not doing it. #Dhurandhar2TheRevenge pic.twitter.com/pmjsNYerp4— Sᴜᴢᴀɴɴᴇ Bᴇʀɴᴇʀᴛ (@suzannebernert) April 9, 2026
दीपिकाने पहिल्यांदाच या विषयावर प्रतिक्रिया दिल्याने अर्थातच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. परंतु तिची ही प्रतिक्रिया पुरेशी नसल्याचं एका अभिनेत्रीने म्हटलं आहे. विविध हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सुझान बर्नर्टने दीपिकावर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय दीपिका.. याला मोठेपणा म्हणत नाही. तू उघडपणे पतीची प्रशंसा करावीस, याची प्रतीक्षा आम्ही अद्याप करत आहोत. मला समजत नाहीये की तू हे कौतुक का करत नाहीयेस’, असा सवाल सुझानने केला आहे. सुझानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी दीपिकाला कदाचित ‘प्रोपगेंडा’ (प्रचारकी) असलेला चित्रपट पटत नसेल, असं म्हटलंय. तर काहींनी तिचं वैयक्तिक मत असू शकतं, असं काहींनी लिहिलं आहे.

Leave a Reply