• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर 2’च्या लाटेत 10 कोटी बजेटच्या चित्रपटाचा बोलबाला; 6 दिवसांत कमावला 302% नफा

April 8, 2026 by admin Leave a Comment


सध्या थिएटरमध्ये कोणता चित्रपट गाजतोय, असा प्रश्न विचारला तर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हेच उत्तर तुम्हाला मिळेल. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात तब्बल 1600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दररोज कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई होत आहे. ‘धुरंधर 2’च्या लाटेत आपला निभाव लागणार नाही या भीतीने अनेक चित्रपटांनी प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. परंतु यात एक असाही चित्रपट आहे, ज्याला रणवीर सिंहच्या या चित्रपटाने काही फरकच पडला नाही. ‘धुरंधर 2’च्या त्सुनामीतही हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. सकारात्मक वर्ड ऑफ माऊथच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.

या चित्रपटाचं नाव आहे ‘वाझा 2’. मूळ मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट दररोज चांगली कमाई करतोय. हा चित्रपट या वर्षातील सर्वांत मोठा मल्याळम हिट चित्रपट बनला आहे. यामध्ये हाशिर एच, अजीन जॉय, विनायक वी आणि एलन बिन सिराज मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा असून 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाझा’चा स्पिरिच्युअल सीक्वेल आहे.

‘वाझा 2: बायोपिक ऑफ अ बिलियन ब्रोज’ या मल्याळम कॉमेडी चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 7.10 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या सहा दिवसांत भारतात या चित्रपटाची कमाई 40.20 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 91.46 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. केरळमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट फक्त दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. या खर्चाच्या तुलनेत चित्रपटाने आतापर्यंत 40.20 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर 30.2 कोटी रुपयांचा परतावा (ROI) मिळाला आहे. हा परतावा 302 टक्के इतका होता. ‘वाझा 2’ने 283.75% इतका लाइफटाइम परतावा देणाऱ्या ‘प्रकंबनम’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

‘वाझा 2’ या चित्रपटाची कथा हाशीर, अॅलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांभोवती फिरते, ज्यांना अनेकदा अपयशी आणि त्रास देणारे म्हणून हिणवलं जातं. प्रचंड सामाजिक दबावाला तोंड देत असताना ते आत्मशोधाच्या एका भावनिक प्रवासाला निघतात. त्यात आलेल्या विविध आव्हानांमधून हे चौघं जण जबाबदारी स्वीकारायला आणि स्वत:च्या अटींवर यश मिळवायला शिकतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच केला युद्धविराम, रिपोर्टने मोठी खळबळ, …तर इराण नाही अमेरिकाच झाली असती उद्ध्वस्त
  • IPL 2026 मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?
  • LPG Gas Supply | LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून पत्रक जारी
  • Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी ‘Playground app’केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर
  • Avimukteshwaranand : मोहन भागवत तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत? शं‍कराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in