• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’ फक्त सिनेमा नाही, 26/11 चा बदला…, मुंबईवर हल्ला… भयानक परिस्थितीत अडकलेला अर्जुन रामपाल म्हणाला…

March 23, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याने देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेनात अर्जुन याने मेजर इक्बाल ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्यासाठी ‘धुरंधर’ सिनेमा फक्त सिनेमा नाही तर, 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा बदला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण गेले… जेव्हा हल्ला झाला तेव्हा अभिनेता अर्जुन रामपाल कुठे आणि कोणत्या परिस्थितीत होता… याबद्दल अभिनेत्याने सांगितलं आहे. एवढंच नाही तर, तब्बल हल्ल्याच्या 17 वर्षांनंतर रामपाल याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्जुन रामपाल याने सांगितलेल्या घटनेची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात अर्जुन याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी अभिनेता म्हणाला, ‘2008 मध्ये 26/11 दरम्यान, मी ताज हॉटेल मध्येच असतो, जर माझ्या मित्राने यायला उशीर केला नसता… त्या दिवशी माझा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत ताज हॉटेलमध्ये जाणार होतो… पण एका मित्राला येण्यासाठी उशीर झालेला आणि मी तर म्हणतो, देव त्याचं भलं करो… आम्ही बाकी मित्र बारमध्ये बसून त्याची प्रतिक्षा करत होतो. आम्ही ड्रिंक ऑर्डर केली आणि तेव्हात माहिम जवळ एक मोठा बॉम्ब स्फोट झाला…’

‘आम्ही तो आवाज ऐकलेला होता…, 10 मिनिटांमध्ये आमचे फोन वाजू लागले आणि कोणी सांगितलं, कोलाबा येथे गँगवार सुरु आहे. 20 – 30 मिनिटं पूर्ण ‘फोर सीजन्स’ हॉटेलला घेराव घालण्यात आला… तेव्हा आदर्श जटियाने आम्हाला सांगितलं, ‘आजची रात्र तुम्ही इथेच राहा… तेव्हा आम्ही कोणालाच बाहेर जाऊ दिलं नाही. अशा प्रकारे मी माझ्या वाढदिवशी हा भयानक हल्ला होताना पाहिला आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘दुसऱ्या दिवशी जेव्हा मी, डाईव्ह करत घरी परतत होतो, तेव्हा जवळपास तीन वेळा मी थांबलो… कारण मला सतत वाटत होतं की, माझी तब्येत ठिक नाही… जेव्हा आदित्य धरने मला 26/11 हल्ल्याचा सीन ऐकवला, तेव्हा मला कळलं की, मी हा बदला नक्की घेईल आणि धुरंधर सिनेमात मी तसंच केलं आहे… आणि फक्त आता एवढंच म्हणेल भारत माता की जय…’



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in