• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’ची छोबीपछाड कामगिरी; नेटफ्लिक्सवर 4 आठवड्यांत नवा रेकॉर्ड

March 1, 2026 by admin Leave a Comment


रणवीर सिंहचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. हा चित्रपट फक्त ब्लॉकबस्टरच ठरला नाही तर तो ग्लोबल सेन्सेशनसुद्धा ठरला होता. आता अवघ्या चार आठवड्यातच या चित्रपटाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2024 पासून आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या मोठ्यातल्या मोठ्या चित्रपटालाही मात दिली आहे. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, ओमान आणि मालदीवमध्येही टॉप 10 नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होतोय. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बहरीन, कुवेत, श्रीलंका, मलेशिया, कतार, युएई, मॉरिशस आणि नायजेरिया यांसारख्या 8 देशांमध्ये टॉप 10 मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’ला चौथ्या आठवड्यात दोन दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाली आहे. तर टॉप 10 नॉन इंग्लिश चित्रपटांच्या ग्लोबल ट्रेंडिंग यादीत हा चित्रपट आठव्या स्थानावर आहे. या चित्रपटाने एका महिन्यातच जवळपास 66.3 दशलक्ष तास पाहिल्याचा आकडा पार केला आहे. 30 जानेवारी 2026 पासून हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होतोय. नेटफ्लिक्सवर 2024 नंतर सर्वाधिक पाहिला गेलेला हा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर’ने विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ या चित्रपटालाही पछाडलं आहे.

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 10 चित्रपट

  1. धुरंधर (2026)- 20.7 दशलक्ष
  2. महाराजा (2024)- 19.7 दशलक्ष
  3. लकी भास्कर (2024)- 19.4 दशलक्ष
  4. क्रू (2024)- 17.9 दशलक्ष
  5. लापता लेडीज (2024)- 17.1 दशलक्ष
  6. शैतान (2024)- 14.8 दशलक्ष
  7. फायटर (2024)- 14 दशलक्ष
  8. अॅनिमल (2024)- 13.6 दशलक्ष
  9. रेड 2 (2025)- 12.3 दशलक्ष
  10. हक (2026)- 11.3 दशलक्ष

‘धुरंधर’ची चार आठवड्यांची व्ह्युअरशिप

  • पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला 7.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, तर 21.6 दशलक्ष तास हा चित्रपट पाहिला गेला. ट्रेंडमध्ये हा पहिल्या क्रमाकांवर होता.
  • दुसऱ्या आठवड्यात ‘धुरंधर’ला 8.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि 28.1 दशलक्ष तास लोकांनी तो पाहिला. या आठवड्यातही हा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी होता.
  • तिसऱ्या आठवड्यात 2.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि 9.9 दशलक्ष तास तो पाहिला गेला. या आठवड्यात रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी राहिला.
  • चौथ्या आठवड्यात या चित्रपटाला 2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि 6.7 दशलक्ष तास तो पाहिले गेला. या आठवड्यात रँकिंग आणखी खाली घसून आठव्या स्थानी राहिला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
  • कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
  • Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….
  • डुकाटीची आतापर्यंतची सर्वात हलकी व वेगवान सुपरबाइक लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in