• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

February 2, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी हा कट असल्याचेही म्हटले. या विमान अपघाताची चाैकशी केली जात असून सीआयडीची स्थापन करण्यात आली.

अजित पवार यांच्या निधनानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. विजय वडेट्टीवार विलगीकरणाबद्दल बोलताना म्हटले की, अजित पवारांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणे आवश्यक आहे का? हा त्या पक्षाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला का सांगितले नाही? किंवा त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल, त्याच पद्धतीने चालतो का?

पण एक खरंय 2 पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली, असे मला वाटते, असे थेट विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की,  खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा ताईंनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपच्या दाबावापुढे असा निर्णय झाला असावा.

कारण विलगीकरण होऊ नये अशी भूमिका भाजपची होती आणि त्यातून भाजपला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपचा बरोबर वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा नव्हती. दशक्रिया झाल्याशिवाय कुठलाही पदभार घेऊ शकत नाही. काल भाजपच्या प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलं की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान राजीव गांधींची नियुक्ती झाली निवड झाली.

पण काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक आहे आणि पंतप्रधान पद एकही दिवस रिकामा ठेवता येत नाही. उपमुख्यमंत्री पद हे काही संविधानिक पद नाही त्यामुळे तेरावीचा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम करता आला असता.  शशिकांत शिंदे यांनीही असा सांगितला त्यांनी शपथही घेतले की चर्चा झाली होती म्हणून राजकारण हे खूप घाणेरडा झालेला आहे, सडक झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
  • पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या
  • हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
  • अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
  • Sangli Car Accident | मद्यधुंद इनोव्हा चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in