• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देश गाजवणाऱ्या भाजपच्या माजी महिला मुख्यमंत्र्यावर आली रस्त्यावर पोहे, जिलेबी विकण्याची वेळ, कारण काय?

April 8, 2026 by admin Leave a Comment


भाजपच्या फायर ब्रँड नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उभा भारती यांचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना दिसत आहेत. उमा भारती यांना रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना पाहिल्यानंतर त्यांच्यावर अशी वेळ का आली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, उमा भारती यांनी गरिबांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. जे रस्त्यावर काही गोष्टी विकून कुटुंबियांची भूक भागवतात…

सांगायचं झालं तर, टिकमगडच्या एसडीएमने अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केल्यामुळे, माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी पोहे आणि जिलेबीचे स्टॉल्स सुरू ठेवून आपला निषेध नोंदवला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, टिकमगड महानगरपालिकेने मंगळवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या आणि छोटी दुकाने पाडून हटवले.

पालिकेच्या या अभियानानंतर उभा भारती स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी टिकमगडच्या रस्त्यांवर स्वतःचा स्टॉल लावला… यादरम्यान, त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला आणि गरीब विक्रेत्यांची उपजीविका हिरावून घेऊ नये व त्यांची दुकाने पूर्ववत करून द्यावीत, असे अधिकाऱ्यांना आवाहन करताना ती दिसल्या.

सोमवारी, त्यांच्या मूळ जिल्हा टिकमगडमध्ये, नगर परिषद, उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि तहसीलदार यांच्या पथकाने सिव्हिल लाइन्स रोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान, जेसीबीच्या मदतीने अनेक छोटी दुकाने आणि हातगाड्या हटवण्यात आल्या. या कारवाईचा उभा भारती यांनी विरोध केला. दुकाने आणि हातगाड्या हटवणं चुकीचं होत.

मंगळवारी सकाळी, उमा भारती सिव्हिल लाइन्स रोडवरील आपल्या बंगल्यातून बाहेर पडून एका हातगाडीजवळ गेल्या. त्यांनी स्वतः पोहे आणि जिलेबी विकून दुकानदारांना मदत केली आणि एका विक्रेत्याला आपली गाडी पुन्हा रस्त्याच्या कडेला लावण्याचा आग्रह केला.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा…

माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या की, हे छोटे व्यापारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करतात. अशा कृतींचा त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होतो. भविष्यात पुन्हा अशी कारवाई झाल्यास, त्या उघडपणे निषेध करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की, गरीब विक्रेत्यांची उपजीविका हिरावून घेऊ नये आणि त्यांची दुकाने पूर्ववत करावीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arjun Tendulkar : सचिनचा लाडका मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आवडता पदार्थ कोणता ? नाव ऐकताच तुमच्या तोंडालाही सुटेल पाणी
  • US Iran Ceasefire : सीजफायरमुळे सगळं जग खुश पण अमेरिकेत बसलेला एक माणूस या निर्णयामुळे खूप दु:खी, ती व्यक्ती ट्रम्प नाही
  • ‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल दीपिका पादुकोण गप्प का? अखेर स्वत:च दिलं उत्तर; ट्रोलरची बोलती केली बंद!
  • LPG Crisis: गॅस बुकिंगबाबत नवीन अपडेट, या ग्राहकांना 1 जुलैपासून मिळणार नाही सिलिंडर
  • सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताय? तर ‘हे’ महत्त्वाचे नियम आजत जाणून घ्या, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in