• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशाची दुसरी वंदेभारत स्लीपर या मार्गावर धावणार, या दोन महानगरांना जोडणार

April 12, 2026 by admin Leave a Comment


भारतीय रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. देशाची दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची अधिकृत घोषणा केली आहे. ही वंदेभारत स्लीपर ट्रेन मुंबई ( CSMT ) ते बंगलोर ( KSR सिटी ) अशी धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे. बंगलुरु सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांचे पत्र शेअर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

२२ तासांचा प्रवास कमी होणार

सध्या बंगलुरु आणि मुंबई या दोन शहराच्या दरम्यान उद्यान एक्सप्रेस दररोज धावते. ही ट्रेन १,१३४ किलोमीटरचे अंतर दूर करण्यासाठी सुमारे २२ तासांचा वेळ लागतो. या ट्रेनचा सरासरी वेग केवळ ५२ किमी प्रति तास आहे. तर रस्ते मार्गाने या प्रवासाला १५ ते १७ तास लागतात. वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस आल्यानंतर हा प्रवास केवळ आरामदायक होणार नाही तर प्रवासाचा कालावधी १६ तासांवर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

वेळ आणि मार्ग लवकरच जाहीर होणार

मुंबई आणि बंगलुरु या मार्गावर देशातील दुसरी वंदेभारत स्लीपर ट्रेन चालवण्यात येणार असली तरी या ट्रेनचे वेळापत्रक आणि स्थानकांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतू प्रवाशांनी सल्ला दिला आहे की हा प्रवास १६ तासांहून अधिक नसावा आणि प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही ट्रेन सायंकाळी ५ वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता बंगळुरुला पोहचली तर प्रवाशांना फायदा होईल अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

कोकण राहिले मागे

असे म्हटले जात होते की ही देशाची दुसरी स्लीपर वंदेभारत एक्सप्रेस कोकणात चालवली जाईल असे वाटत होते. मात्र, बंगलुरु आणि मुंबई दरम्यान प्रीमीयम ट्रेन (उदा. दुरंतो आणि राजधानी ) नसल्याने बंगलोरला ही ट्रेन मिळाली असे म्हटले जात आहे. बंगलुरु आणि मुंबई दरम्यान गेल्या ३० वर्षांपासून सुपरफास्ट ट्रेनची मागणी केली जात होती.

वंदे भारत स्लीपरचे वैशिष्ट्ये

वंदे भारत स्लीपर कोच वेगाबरोबरच यातील अत्याधुनिक सुविधेसाठी प्रसिद्ध आहे. ही ट्रेन आरामदायी आहे. यातून प्रवास करताना प्रवाशांना कोणताही झटका किंवा हादरा बसत नाही.या ट्रेन सुरक्षेसाठी ‘कवच’ ही टक्कर विरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच या ट्रेनमध्ये वर्ल्ड क्लास टॉयलेट्सची सुविधा असून बाथ घेण्याची सुविधा देखील आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अखेर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, सौदी अरेबियाचं सिक्रेट समोर येताच खळबळ, एकीकडे शांततेसाठी चर्चा तर दुसरीकडे…
  • इराणच्या ‘त्या’ कठोर मागण्या आणि अटी…ज्यामुळे ‘इस्लामाबाद टॉक्स’ फेल
  • MI vs RCB Live Updates, IPL 2026: मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी सज्ज, वानखेडेत महामुकाबला
  • LIVE सामन्यात राजस्थानच्या मॅनेजरने मोबाईल वापरला, काय शिक्षा मिळणार? बीसीसीआकडून मोठी अपडेट
  • Jalgaon | ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in