• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवा घरी स्वत:ची काळजी घे रे.. मित्रांसह नेटकऱ्यांनाही शॉक; सुप्रसिद्ध रील स्टारच्या निधनावर सोशल मीडिया हळहळला

January 26, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदम यांचं निधन झालं आहे. आजारपणामुळे त्याने आपले प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आजारपणाबद्दल सांगितलं होतं. परंतु त्यानंतर इतक्या लगेच तो हे जग सोडून जाईल, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. प्रथमेश त्याच्या आईसोबत इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट करायचा आणि त्याला नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती. आता प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

तन्मय पाटेकरची पोस्ट-

‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश.. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे. खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई,’ अशा शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तन्मयने प्रथमेशच्या अंत्ययात्रेबद्दलचीही माहिती दिली आहे. अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजता राहत्या घरून निघेल, असं त्याने लिहिलं आहे. यासोबतच त्याने घरचा पत्तासुद्धा दिला आहे. मालाड पूर्व इथल्या राहत्या घरातून प्रथमेशची अंत्ययात्रा निघणार आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काय झालं अचानक, हे धक्कादायक आहे’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘प्रथमेश.. खूप घाई केलीस’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘कायम आठवणीत राहशील.. खूप मोठा धक्का बसलाय’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanmay Chandramohan Patekar (@tanmaypatekar2424)

वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आईलाही धीर दिला होता. आईसोबत मिळून तो सोशल मीडियावर रील पोस्ट करू लागला होता आणि त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी सोशल मीडियावर पसंतीस उतरली होती. इन्स्टाग्रामवर प्रथमेशचे 1 लाख 85 हजारांहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. आधी पती आणि आता पोटच्या मुलाचं निधन झाल्यामुळे प्रथमेशच्या आईवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in