• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवाला वाहिलेलं ‘फुल’ मातीमोल होताना कुणीच कसं पाहिलं नाही? अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाची ‘फुला’

March 17, 2026 by admin Leave a Comment


वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या फुला या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुबोध भावेच्या धीरगंभीर आवाज असलेल्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. येत्या 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्या धाटणीचा चित्रपटाने आता उत्सुकता निर्माण केली आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. साखळदंडानी बांधलेली, जमिनीवर आडवी झालेली, आजुबाजूला हळद पडलेली अशी फ्रेम, सुबोध भावे यांच्या आवाजात यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता या संस्कृत ओळींनी सुरू होणारा टीझर लक्ष वेधून घेतो. त्यानंतर एका मागोमाग एक देखण्या दृश्यप्रतिमांतून या चित्रपटाचा पोत कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. एका मुलीच्या अस्तित्वावर निर्माण होणारा समाजाचा प्रश्न हा या चित्रपटातून मांडला जाणार आहे. या टीझरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचंच आहे. तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली. राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in