• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुसऱ्या पुरुषासोबत हलाला करुन ये मगच तुला…, नव्या नवरीला तलाक देत नवऱ्याचं घाणेरडं कृत्य

February 3, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून अनेक महिलांनी तर स्वतःचं आयुष्य देखील संपवलं आहे. आता देखील एका महिलेसोबत घडलेली धक्कादायक घटना समोर येत आहे. महिला लग्न होऊन सासरी गेली. सुखी संसाराचे स्वप्न पाहिलेल्या महिलेच्या नशिबात मात्र काही भयानक लिहिलेलं होतं. लग्नात मिळालेला हुंडा आवडला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी महिलेसोबत वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, नवऱ्याने तलाक देत महिलेला दुसऱ्या पुरुषासोबत हलाला करुन ये… त्यानंतरच तुला स्वीकारेल… अशी अट ठेवली… अखेर सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली आणि धक्कादायक घटना समोर आली.

संबंधित घटना उत्तर प्रदेश येथील बांदा येथील आहे… जेथे लग्नानंतर एका महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास सासरच्यांकडून दिला जात होता. एवढंच नाही तर, पुन्हा नांदायचं असेल तर, सासरच्या मंडळींनी महिलेपुढे हलाला करण्याची अट घातली. ज्यामुळे त्रासलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह चार जणांवर हुंड्यासाठी त्रास, मारहाण आणि अन्य गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

हुंड्यासाठी छळ

संबंधित प्रकरण माटुंध पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जिथे एका तरुणीने तिच्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, जून 2025 मध्ये महिलेच्या वडिलांनी आपल्या क्षमतेनुसार, लेकीचं लग्न केलं. लग्नानंतर महिला सासरी गेली. पण पती आणि अन्य मंडळी मिळालेल्या हुंड्यावर नाराज होते. महिलेने आरोप केला आहे की, यामुळे लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. तिला दिवसेंदिवस उपाशी ठेवण्यात आलं. पण महिलेने कधीच तक्रार केली नाही. प्रकरण वाढत असताना पोलिसांनी अनेक वेळा तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु सासरच्या लोकांच्या वागणुकीत कोणतेच बदल झाले नाहीत. डिसेंबर 2025 मध्ये, तिला मारहाण करून तिच्या सासरच्या घरातून हाकलून देण्यात आलं.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ‘सासरच्या मंडळींनी सांगितलं, तुझ्या आई – वडिलांना बोलाव… आम्हाला दोन लाख रुपये… एक हिरो होंडा बाईक द्यायला सांगत आम्ही तुला तलाक दिलेला आहे. आता आम्ही तुला आमच्यासोबत ठेवणार नाही… जेव्हा तू हलाला करुन येशील तेव्हाच आम्ही तुझा स्वीकार करु…’, या घटनेनंतर महिला पोलिसांकडे गेली आणि तक्रार दाखल केली … पोलिसांनी पती सोबतच सासरच्या मंडळींवर देखील कारवाई केली.

माटुंध पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रार दाखल केली आहे आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल…. असं देखील पोलीस म्हणाले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
  • मोठी बातमी! युद्धात मोठं ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये थेट सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ
  • 24 कॅरेट सोने नेहमीच ‘सर्वात शुद्ध’ नसते ? सोने खरेदी करताना 995, 999 आणि 999.9 याचा फरक जाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in