• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, सिमेंटच्या ओट्यावरच… त्या घटनेनं पुणे हादरलं

April 7, 2026 by admin Leave a Comment


राज्यात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून पुण्यातील शिरूर येथे तर मनाचा थरकाप उडवणारी भयानक घटना घडली आहे. देवाचं दुसरं स्वरूप मानल्या जाणाऱ्या आईने, आपल्या पोटच्या गोळ्याची, अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दुसरा चांगला नवरा करायचा म्हणून 11 महिन्याच्या बाळाचा आईनेच खून केला. शिरूर तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे माणूसकीला अक्षरश: काळीमा फासलेला असून यामुळे सर्वच लोकं चक्रावले आहेत. एखादी आई एवढी निष्ठूर कशी होऊ शकते, हाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. या खुाप्रकरणी पूजा रवींद्र पवार या आईला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

चांगला नवरा करायचा, मुलाचा अडसर नको म्हणून केली हत्या

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात हा भयानक प्रकार घडला. आरोपी महिला ही कोकण मुरुड येथून फिरून आली होती. मात्र 11 महिन्यांचा मुलगा, कु. यश रविंद्र पवार हा नेहमी किरकिर करायचा, रडायचा. यामुळे आरोपी पूजाने घरातून कुठेतरी निघून जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावं असा तिचा प्लान होता, मात्र आपण जर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन गेलो, तर कोणीही पाहणार नाही, आपल्याशी कोणीच लग्न करणार नाही अा विचार तिच्या मनात आला. आणि त्यामुळेच या मार्गातून मुलाला दूर करण्यासाठी तिने त्याचा काटा काढण्याचा कट रचला.

त्यानंतर आरोपी महिला पूजा हिने तिच्या पोटच्या गोळ्यीची, अवघ्या 11 महिन्यांचा मुलाची हत्या केली. तिने तिच्या लहान मुलाचं, यशचं डोकं हे सिमेंटच्या ओट्यावर आपटलं आणि त्याचा खून केला, अशी कबुली तिने दिली. एवढंच नव्हे तर या बद्दल कोणालाही कळू नये, गुन्हा उघडकीस येऊन नये, तो लपवण्यासाठी म्हणून तिने तिच्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरला. आणि नंतर तिने ती बॅग शेतातील एका विहीरीत टाकून दिली. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जन्मदात्या आईकडूनच एवढा अमानुष प्रकार घडल्याने नागरिक संतापले असून लहान मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस स्टेश मध्ये तक्रार दिली होती, पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला ‘ही’ लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
  • LPG Crisis : युद्धाच्या धामधुमीदरम्यान सरकारची मोठी घोषणा, आता मिळणार डबल सिलेंडर.. फायदा कोणाला ?
  • कच्च्या दुधाचे चेहऱ्यास होणारे फायदे, फक्त 5 मिनिटं दुधाने मसाज करा, पाहा फायदे
  • श्वेता तिवारीला टक्कर देणारी टीव्ही अभिनेत्री; 100 कोटींच्या आलिशान घरात राहते, ग्लॅमरस पाहून व्हाल थक्क
  • KKR vs PBKS : कोलकाता-पंजाब सामना पावसामुळे रद्द, केकेआरची विजयाची प्रतिक्षा कायम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in