• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुर्मिळ चौसिंगा हरणाला गोळ्या घातल्या…पानशेतच्या रस्त्यावर रक्ताचे सडे; चौघांना अखेर… पोलिसांची मोठी कारवाई

December 30, 2025 by admin Leave a Comment


राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली सिंहगड भागात वन्यप्राण्यांच्या शिकणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. राजगडच्या पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथे दुर्मिळ चौसिंगा हरिणाची बंदुकीने गोळ्या घालून शिकार करण्यात आली. अखेर रक्ताळलेल्या हातांनी हरिणाच्या मांसाची वाटणी करणाऱ्या चौघांना राजगड तालुका वन विभागाने अटक केली आहे. या घटनेमुळे पानशेत सिंहगड भागात खळबळ उडाली आहे ऐन नविन वर्षाच्या तोंडावर पर्यटकांची वर्दळ असलेल्या या परिसरात शिकारीचा प्रकार घडल्याने वन विभाग अलर्ट झाले आहे.

राजगड वन विभागाचे वन रक्षक राजेंद्र निबोंरे हे जंगलात गस्तीवर असताना काल रविवारी (२८) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. समीर वसंत पिलाणे (वय ३६ ) , गणेश बबनराव लोहकरे (३८) दोघे राहणार रा.ओसाडे , नवनाथ चंद्रकांत पवळे ( वय ४०, रा. सोनापुर, ता. हवेली) व पांडुरंग दत्तात्रय कदम (वय ४७, रा. निगडे मोसे,ता. राजगड) अशी अटक करण्यात आलेल्या शिकणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजगड तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे तपास करत आहेत. वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार चौघा शिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिणाच्या मांसासह सापडले शिकारी

समीर पिलाणे, नवनाथ पावले, गणेश लोहकरे व पांडुरंग कदम यांनी सरकारी वनक्षेत्रा शेजारच्या खाजगी मालकी जंगलात चौसिंगा हरिणाला बंदुकीने गोळ्या घालून ठार मारले. वनरक्षक राजेंद्र निबोंरे यांच्या जागृतेमुळे आरोपी शिकार केलेल्या हरिणाच्या मांसासह सापडले. त्यांच्याकडून बंदुकीसह इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

वन्यप्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमाखाली वन्यप्राण्यांची निघृण शिकार करणाऱ्यास ७ वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे असं राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले. हा गुन्हा अजामीनपात्र असुन दखलपात्र आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी शिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी वन विभागाची पथके, गुप्तहेर सज्ज केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

शिकारीची माहिती मिळताच पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, यांच्या देखरेखीखाली राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे वनपरिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, दया डोमे, वैशाली हाडवळे, मंजुषा घुगे, वनरक्षक राजेंद्र निंभोरे, वनरक्षक ए. आर. सोनकांबळे, वनरक्षक एस. एन. कांबळे, वनरक्षक वाय. बी. टिकोळे, वनरक्षक सुनिल होलगिर, वनरक्षक निखील रासकर, वनरक्षक एस. के. भैलुमे, वनरक्षक बी. एल. जगताप, वनरक्षक स्वप्निल उंबरकर, वनरक्षक अर्चना कोरके, वनरक्षक अमोल गायकवाड, वनरक्षक संतोष रणसिंग, वनरक्षक विकास निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली . रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सखोल तपास सुरू होता.

यापूर्वी या आणि इतर शिकणाऱ्यांनी कोणत्या कोणत्या जंगलात, खाजगी रानात वन्यजीवांची शिकार केली आहे का? इतर शिकारी आहेत का? बंदुकीला परवाना आहे का? आदी बाबींचा सखोल तपास वन विभागाची पथके करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लोकांच्या घोळक्यात प्रामाणिक व्यक्ती ओळखावी तरी कशी? चाणक्य म्हणतात…
  • Vijay Hazare Trophy : विराट या 5 फलंदाजांसमोर कुठेच नाही, विदर्भाच्या पोट्ट्याचा समावेश, सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
  • BJP Faces Internal Strife : छ. संभाजीनगरात भाजपात निष्ठावंतांची नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
  • New Year 2026: गोंगाट, पार्टी आवडत नाही का? नवीन वर्षाचा पहिला दिवस खास कसा बनवायचा? जाणून घ्या
  • Year Ender 2025 : कसोटी क्रिकेटमधील या वर्षातील 10 मोठे वाद, यामुळे क्रिकेटविश्वात उडाली खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in