• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दारू पिऊन मारलं, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं..; IPL च्या प्रसिद्ध क्रिकेटरविरोधात पत्नीचे गंभीर आरोप

March 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध उत्तर प्रदेशातील कानपूर इथल्या एका 35 वर्षीय मॉडेलने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. गरिमा तिवारी असं या मॉडेलचं नाव असून तिने हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. गरिमाने अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलंय. अमित मिश्रा याच्यासोबतच तक्रारीत त्याची आई बिना मिश्रा, वडील शशिकांत मिश्रा, भाऊ अमर मिश्रा, मेहुणी रितू मिश्रा आणि बहीण स्वाती मिश्रा यांचाही सहआरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना गरिमा म्हणाली, “माझी आणि अमित मिश्राची ओळख 2019 मध्ये इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. 26 एप्रिल 2021 रोजी कानपूर क्लबमध्ये लग्न करण्यापूर्वी जवळपास तीन वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. लग्नानंतर लगेचच माझा नवरा आणि सासरच्या लोकांनी माझ्या कुटुंबावर होंडा सिटी कार आणि हुंडा म्हणून 10 लाख रुपये देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. लग्नानंतर माझी पाठवणी करताना माझ्या कुटुंबीयांनी 2.5 लाख रुपयांची व्यवस्था केली होती. परंतु त्यानंतरही अधिक पैशांची मागणी सुरूच होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Mishra (@amitmishi)

अमित दारू पिऊन वारंवार तिला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि कधीकधी तिला काही दिवस खायला-प्यायलाही दिलं जात नव्हतं, असे गंभीर आरोप गरिमाने केले आहेत. इतकंच नव्हे तर मॉडेलिंगच्या कामातून मिळालेले पैसे तो हिसकावून घेत असे आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असे, असाही दावा तिने केला आहे. या सततच्या छळामुळे ती नैराश्यात गेली आणि तिला मॉडेलिंगचं करिअरदेखील सोडावं लागलं, असं तिने सांगितलं आहे.

गरिमाने या छळाला वैतागून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. एकदा फिनाइल पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पोलीस आयुक्त कार्यालयासह अनेक वेळा पोलिसांशी संपर्क साधूनही अमित मिश्राच्या प्रभावामुळे एफआयआर नोंदवण्यात आला नाही, म्हणून मी अखेर न्यायालयात धाव घेतली, असं गरिमाने स्पष्ट केलं. तिचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितलं की, पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आली. गरिमाने अमितविरोधात दाखल केलेला हा तिसहा कायदेशीर खटला आहे. याआधी तिने 21 एप्रिल 2025 रोजी त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. त्यानंतर 23 एप्रिल 2025 रोजी तिने नुकसान भरपाईची याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिने मासिक 50 हजार रुपये भत्ता आणि 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in