• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय

April 9, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा म्हंटल की शरीरातून घाम जास्त येणे , थकवा, डिहाइड्रेशन आणि त्वचेच्या समस्या या व्यतिरिक्त आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय करत असतो. अशातच कोरफडीचा ज्यूस पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर त्वचा आणि पोटासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीचा गर हा पोषक तत्वांनी समृद्ध असतो आणि त्याच्या नियमित सेवनाने शरीर आतून निरोगी आणि उत्साही राहते. चला तर मग आजच्या लेखात आपण मुरूम आणि बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी कोरफडीचा ज्यूस कशाप्रकारे कामं करते ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोरफडीचा ज्यूस पिणे फायद्याचे

1. शरीराला थंड करते

कोरफडीच्या गरापासून तयार ज्यूस नैसर्गिकरित्या थंड असतो. उन्हाळ्याच्या उष्णतेत त्याचे सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा मिळण्यास मदत होते, ज्यामुळे उष्माघात, चक्कर आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो.

2. त्वचेला चमकदार बनवते

उन्हाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्वचेला आतून आर्द्रता आणि पोषण मिळते. तसेच त्याच्या नियमित सेवनाने त्वचा नितळ, मऊ आणि तेजस्वी राहण्यास मदत होते, तसेच मुरुमे आणि डाग कमी होण्यासही मदत होते.

3. पोट स्वच्छ आणि मजबूत ठेवते

उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त या सामान्य समस्या अनेकांना होत असतात. तर यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफडीचा ज्यूस पिणे. यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि पोट स्वच्छ राहते. त्याचबरोबर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

4. शरीरात पाण्याची पातळी योग्य राहते

वाढत्या तापमानामुळे शरीरातून जास्त घाम येतो ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू लागते. अशावेळेस तुम्ही कोरफडीचा ज्यूसचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची पातळी टिकवून राहते आणि तहान भागवण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या गरातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

5. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून उन्हाळ्यातील आजारांशी लढण्यास मदत करतात.

कोरफडीचा ज्यूस कसा बनवायचा?

ताज्या कोरफडीचा गर काढून तो पाण्यात मिसळा. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस, मध किंवा काळे मीठ टाकून मिश्रण मिक्स करा. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोरफडीचा ज्यूस पिणे सर्वात फायदेशीर ठरते. बाजारात मिळणारे ज्यूसही पिऊ शकता.

सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे:

कोरफडीचा ज्यूस फायदेशीर असला तरी गर्भवती महिला, लहान मुले किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

कोरफडीचा ज्यूस हा उन्हाळ्यातील एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे, जो शरीराला थंडावा देण्यासोबतच त्वचा आणि पचनक्रिया सुधारतो. याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केल्यास तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in