• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थुंकण्यापासून कचरा जाळण्यापर्यंत… मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोणाला किती दंड?

February 3, 2026 by admin Leave a Comment


मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ शहर बनवण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठे पाऊल उचलले आहे. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी-२०२५ ही नवी नियमावली मुंबईत लागू करण्यात आली आहे.

या नियमावलीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकूण २१ कडक नियमांचा समावेश आहे. यात कचरा करणाऱ्यांपासून ते पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांपर्यंत सर्वांना कायद्याच्या चौकटीत आणण्यात आले आहे. ही नवी नियमावली केवळ सामान्य नागरिकांपुरती मर्यादित नाही. यात खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे. रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्थानक परिसरात घाण करणाऱ्यांवर तात्काळ दंड लागू करण्यात येणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्यास संपूर्ण सोसायटीला दंड होऊ शकतो. हॉटेल, दुकाने आणि मॉल यांना त्यांच्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी लागेल आणि सार्वजनिक उत्सवांच्या वेळी कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कोणाला किती दंड?

गुन्ह्याचे स्वरूप दंडाची रक्कम विशेष टीप
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २५० रु. पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर विशेष नजर.
रस्ते/पदपथावर कचरा टाकणे ५०० रु. घरगुती किंवा खाऊचा कचरा रस्त्यावर फेकल्यास.
उघड्यावर लघवी/शौच करणे ५०० रु. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याबद्दल.
ओला-सुका कचरा वेगळा न करणे २०० ते १००० रु. सोसायट्यांसाठी दंड १००० रुपयांपर्यंत.
पाळीव प्राण्यांची विष्ठा १,००० रु. पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकावर दंड.
आंघोळ/कपडे धुणे ३०० रु. सार्वजनिक नळांवर किंवा रस्त्याच्या कडेला आंघोळ केल्यास.
कचरा जाळणे १०,००० रु. धुरामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मोठी कारवाई.
बांधकाम राडारोडा (Debris) २०,००० ते २५,००० रु. अनधिकृतपणे राडारोडा टाकणे किंवा त्याची वाहतूक करणे.

दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा (Debris) टाकल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होते आणि वाहतुकीला अडथळा येतो. हे रोखण्यासाठी उपायुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. विनापरवाना राडारोडा वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करण्यासोबतच २५,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले की, दंड आकारणे हा पालिकेचा मुख्य उद्देश नसून मुंबईकरांमध्ये स्वच्छतेची शिस्त लावणे हा आहे. नागरिकांनी कचरामुक्त मुंबई मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट मिळणार 4200, सरकारने…
  • मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in