• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थायरॉईडचा होतोय त्रास? ‘या’ गोष्टी करुन आरामात नियंत्रणात येईल ठेवता

April 5, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात पाहायला गेलं तर, 100 पैकी 95 महिलांना थायरॉईड, PCOD आणि PCOS यांसारख्या समस्या असतात. ज्यामुळे महिलांच्या रोजच्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. आता तर  8 – 10 वर्षां पुढील मुलींंमध्ये थायरॉईडची लक्षणं दिसून येतात. याचं कारण आहे जीवनशैली… बदलती जीवनशैली आणि प्रचंड तणावामुळे, अलीकडच्या काळात थायरॉईडच्या समस्या एक जीवघेणा आजार बनला आहेत. मानेमध्ये असलेली ही लहान ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तिचे नियंत्रण सुटले, तर वजन वाढणे, केस गळणे आणि तीव्र थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पण, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य आहाराचे नियम पाळल्यास या समस्येवर प्रभावीपणे मात करता येते. तर थायरॉईडचा सामना करत असलेल्या महिलांनी काय करावं आणि काय करु नये जाणून घ्या…

थायरॉईड असलेल्या लोकांनी काय टाळालं पाहिजे….

थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन असताना काही विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ समस्या अधिक गंभीर करू शकतात.

सोया प्रॉडक्ट्स: सोयाबीन आणि सोया दुधामुळे थायरॉईडच्या औषधांच्या परिणामात अडथळा येऊ शकतो.

कच्च्या भाज्या: कोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी कच्च्या खाऊ नयेत. त्यांना शिजवल्याने त्यांमधील गॉयट्रोजेनचा प्रभाव कमी होतो.

जंक फूड – साखर: प्रक्रिया केलेले पदार्थ, त्यातील साखरेचे आणि मिठाचे उच्च प्रमाण शरीरातील दाह वाढवते.

कॅफीन – अल्कोहोल: कॉफी, चहा आणि अल्कोहोल हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.

तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी सुपरफूड्स

थायरॉईड ग्रंथीच्या सक्रिय कार्यासाठी ही पोषक तत्वे आवश्यक आहेत.

आयोडीन: दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि आयोडीनयुक्त मीठ यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

सेलेनियम – झिंक: बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि संपूर्ण धान्ये हार्मोनच्या निर्मितीस मदत करतात.

प्रथिने: अंडी, पनीर आणि चणे यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ चयापचय सुधारतात.

हिरव्या भाज्या: ताजी फळे आणि हिरव्या भाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे पुरवतात.

जीवनशैलीत हे 5 बदल करा

फक्त अन्नच नाही, तर सवयीही बदलण्याची गरज आहे.

व्यायाम: थायरॉईडच्या आरोग्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा योगा करणे चांगले असते.

तणाव व्यवस्थापन: ध्यानाच्या माध्यमातून तणाव कमी केल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात.

झोप: हार्मोन्सचे संतुलन पूर्ववत करण्यासाठी दिवसातून 7 – 8  तास गाढ झोप आवश्यक असते.

नियमित तपासण्या: दर 3 किंवा 6  महिन्यांनी थायरॉईड प्रोफाइल तपासणी केली पाहिजे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in