• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थकले, निघून गेले, PM मोदी यांची विरोधी पक्षाच्या सभात्यागावर जोरदार टीका, म्हणाले काँग्रेस सरकारकडे…

February 5, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधीपक्षांच्या दुटप्पीपणावर जोरदार टीकास्र केले. राज्यसभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करुन व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतू काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांना मोदी यांनी आदरणीय खरगे जी तुमचे वय पाहाता, तुम्ही उभे राहून घोषणाबाजी करु नका, तुम्ही बसूनही घोषणा देऊ शकता.मागे अनेक युवक नेते उपस्थित आहेत, असा सल्ला दिला.

वॉकआऊटवर विरोधी पक्षांना इशारा

पीएम मोदी काँग्रेसवर जोरदार टीका करताना म्हणाले की जे लोक थकले, ते निघून गेले. परंतू यांना प्रश्न करणे गरजेचे आहे की देशाची अशी अवस्था का होती की कोणताही देश आपल्याशी करार करण्यास पुढे आला नाही. तुम्ही प्रयत्न केला असेल, परंतू कोणी तुमच्या सोबत काम करण्यास तयार नव्हता.

काँग्रेसचे माजी पंतप्रधानांच्या कामांवर मोदी यांची टीका

काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांच्या कामावर टीका करताना पीएम मोदी म्हणाले की जर तुम्ही लाल किल्ल्यांवरील काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या भाषणांचे विश्लेषण केले तर स्पष्ट दिसेल की त्यांचा कोणताही स्पष्ट विचार नव्हता. न व्हीजन आणि न इच्छा शक्ती. याचे परिणाम देशाला भोगावे लागले.

त्यांचे काचेचे महल आणि बोफोर्स

पीएम मोदी म्हणाले की काँग्रेस असो, टीएमसी असो, डीएमके असो वा लेफ्ट असो हे दशकांहून अधिक काळ सत्तेत राहिले आहेत. सत्तेचे भागीदार राहिले आहेत. राज्यातही त्यांना सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे.परंतू त्यांची ओळख काय बनली आहे. आज डीलची चर्चा होते तेव्हा अभिमानाने सांगतो. तेव्हा बोफोर्स डीलची आठवण यायची. त्यांनी केवळ खिसे भरण्याचे काम केले. नागरिकांच्या जीवनातील बदल ही त्यांची प्राथमिकता नव्हती. त्यांनी म्हणाले की,एक आपले माननीय सदस्य येथे बसून बोलत होते. ज्यांचे सरकार दारुत बुडाले. ज्यांचे काचेचे राजवाडे घर-घरांच्या डोळ्यात बसले. अशा सर्व साथीदारांना मी सांगू इच्छीतो तुम्ही जगाला किती धोका द्याल, आरसा पहाल तर आपले सत्य कुठे लपवाल.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in