• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘त्या’ 3 शब्दांमुळे वाचाला इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलटचा जीव, विमान कोसळल्यानंतर शेवटचे शब्द काय होते?

April 8, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान इराणवर हल्ला करण्यासाठी आलेलं अमेरिकेचं F-15E स्ट्राइक इगल फायटर जेट इराणने पाडलं होतं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का होता. इराणने अमेरिकेचं जे विमान पाडलं त्यामध्ये दोन क्रू होते, एक पायलट आणि दुसरा व्यक्ती हा वेपन्स सिस्टम ऑफिसर (WSO) होता. जेव्हा इराणने या फायटर जेटवर हल्ला केला तेव्हा या दोघांनी पॅराशूटच्या मदतीने विमानातून खाली उडी मारली. मात्र ते वेगवेगळ्या ठिकाणी लँड झाले. यातील वेपन्स सिस्टम ऑफिसर जो होता तो जखमी झाला होता. मात्र तरी देखील त्याने जीवंत राहण्याची आशा सोडली नव्हती. जोपर्यंत त्याला अमेरिकेकडून मदत मिळत नाही, तोपर्यंत तो डोंगराच्या कड्या कपारीमध्ये लपला होता.

इराणकडून या विमानातील पायलटचा शोध घेतला जात होता, जो पायलट आणि या अधिकाऱ्याला जिंवत पकडून आणून देईल त्यासाठी इराणने बक्षीसाची देखील घोषणा केली होती. या पायलटला शोधण्यासाठी इराणच्या सैन्यांनी आकाश पाताळ एक केलं होतं. मात्र त्याचवेळी एक मोठा चमत्कार घडला आणि त्या दोघांचे देखील जीव वाचले. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं आधीच आपल्या पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं.

परंतु जेव्हा हे विमान खाली कोसळलं तेव्हा या विमानात असलेला वेपन्स सिस्टम ऑफिसर जखमी झाला होता. तो तिथेच लपून बसला होता. आणि त्याने अमेरिकेला तीन शब्दांचा एक संदेश पाठवला होता. याबाबत स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. विमान कोसळल्यानंतर आम्हाला इराणमधून God is good असा तीन शब्दांचा मॅसेज प्राप्त झाला होता. तेव्हा आम्हाला सुरुवातील वाटलं की ही शत्रू राष्ट्राची काही चाल असू शकते. मात्र त्यानंतर आम्हाला कळालं की हा ऑफीसर अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा होता, त्यामुळे त्याने असा संदेश पाठवला, त्यानंतर आम्ही त्याच्या लोकेशनचा शोध घेऊन त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. विमान कोसळल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बचावासाठी दोन वेगवेगळी ऑपरेशन्स राबवण्यात आली. दिवसा जी मोहीम राबवण्यात आली तेव्हा पायलटला इराणमधून सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलं, तर रात्रीच्या वेळी जी मोहीम राबवण्यात आली, त्यावेळी वेपन्स सिस्टम ऑफिसरला आम्ही शोधून काढलं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…
  • Crude oil price drop: अमेरिका-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर तेलाचे भाव धडाम् ! पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी ?
  • सूरज चव्हाण होणार लवकरच बाप, लग्नाच्या चार महिन्यातच समोर आली गुड न्यूज, संजनाने शेअर केले बेबी बंपचे फोटो
  • Strait Of Hormuz : हॉर्मुज जवळच्या समुद्रात चीन-पाकिस्तानची खतरनाक चाल, भारताची कोंडी करण्यासाठी टाकला नवीन डाव
  • आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in