• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्याशिवाय काही पर्याय उरला नाही..; ट्रम्प, नेतान्याहू यांच्यावर जावेद अख्तरांची सडकून टीका

March 1, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली आणि त्या देशावर जोरदार हल्ले केले. अमेरिकेनं या मोहिमेला ‘एपिक फ्युरी’ तर इस्रायलने ‘लायन्स रोअर’ नाव दिलं. इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले केले. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटले आहेत. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्धा याप्रकरणी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यावर टीका केली आहे.

जावेद अख्तर यांचं ट्विट-

‘मला असं वाटतं की यावेळी ट्रम्प आणि इस्रायल यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अती दिखावा केला आहे. कारण इराक आणि इराणसोबत अशी परिस्थिती निर्माण करून त्यांना यातून धाडसाने सुटका करून घेण्याची परवानगी दिली तर चीन जगात आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावेल. नेतान्याहू आणि ट्रम्प यांनी इतर सर्व गुंडांप्रमाणेच इतरांनाही अडचणीत आणलं आहे. शेवटी निर्णायक पद्धतीने प्रतिक्रिया देण्याशिवाय इतरांसमोर पर्याय उरला नाही,’ असं त्यांनी लिहिलं आहे. अख्तर यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

I think this time trump and Israel have over played there hand because if they are allowed to get away with this audacity and do an Iraq to Iran China will lose her total credibility in the world . Netanyahu and Trump like all the bullies have pushed others to the wall and…

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 1, 2026

अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्लाह अराफी यांची निवड करण्यात आली आहे. खामेनेई यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे आघाडीवर होते. ते 67 वर्षीय धर्मगुरू आणि खामेनेई यांचे जवळचे सहकारी आहेत. अयातुल्लाह खामेनेई हे 1989 पासून इराणचं नेतृत्व करत होते. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

कशासाठी होत आहेत हल्ले?

इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबद अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने दबाव होता. इराण युरेनियम समुद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती मर्यादित ठेवण्यास राजी झाला होता. मात्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमही आवरता घ्यावा ही अमेरिकेची मागणी इराणला मंजूर नव्हती. यासंबंधी ओमानमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. त्यांच्या समाप्तीआधीच अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in