• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो आला, त्याने पाहिलं अन्…; मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

April 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत बिबट्यांचा शिरकाव वाढला आहे. त्यातच आता मुंबईतील गोरेगाव परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील रहेजा हाईट्स सोसायटीमध्ये बिबट्याने शिरुन कुत्र्‍यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या सर्व थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय दबावानंतर अखेर वनविभागाने या परिसरात पिंजरा तैनात केला आहे.

नेमकी घटना काय?

नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये एक कुत्रा शांतपणे उभा असताना दिसत आहे. त्याचवेळी अचानक अंधारातून एका बिबट्याने वेगाने झडप घातली. या बिबट्याने कुत्र्याची मान पकडून त्याला काही अंतरापर्यंत ओढत नेले. पण त्यानंतर काही क्षणातच बिबट्याने कुत्र्याला सोडून तिथून पळ काढला. त्यानंतर भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेने निघून गेला. या जीवघेण्या हल्ल्यातून कुत्रा थोडक्यात बचावला असला तरी या घटनेने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

महिनाभरातील दुसरी घटना 

दरम्यान रहेजा हाईट्समध्ये बिबट्या शिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १७ मार्चला एका बिबट्याने याच सोसायटीत शिरकाव करून अल्फी नावाच्या पाळीव कुत्र्याला ठार केले होते. एकाच महिन्यात दोनदा अशा घटना घडल्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या दाव्यानुसार, परिसरात एक नाही तर दोन बिबट्यांचा वावर असून, सातपाटी आणि नागरी निवारा परिसरातही त्यांचे दर्शन झाले आहे.

रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत

दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे रहिवाशांनी संध्याकाळी घराबाहेर पडणे बंद केले आहे. लहान मुलांना सोसायटीच्या मोकळ्या आवारात खेळण्यासाठी पाठवणे पालकांनी पूर्णपणे बंद केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सोसायटी प्रशासनाने सुरक्षारक्षकांना शिट्ट्या, काठ्या आणि बॅटरी देऊन गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर सोसायटीने वनविभागाकडे दाद मागितली होती. याची दखल घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) पथकाने परिसराची पाहणी केली.

यानतंर वनविभागाने गुरुवारी रात्री उशिरा पार्किंग परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी हाय-टेक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासोबत बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळू नये म्हणून परिसरातील वाढलेली झुडपे कापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सोसायटी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वन्यजीव पाहायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांतील वाढती आक्रमकता पाहून बिबट्याला लवकरात लवकर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
  • Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका
  • कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका…
  • Sanjay Raut : सीजफायरचं श्रेय पाकिस्तानला जाताच राऊत खूप जिव्हारी लागणारं बोलले, जयशंकर माकड, मोदी टेलिफोन ऑपरेटर
  • KKR vs PBKS: एक पॉइंट दिला..! श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूख खानच्या संघाची उडवली खिल्ली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in