• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो आजही येणार… अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची..

April 3, 2026 by admin Leave a Comment


भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. काल अवकाळी पावसाने पुण्यात थैमान घातले. दिवसाच पावसामुळे अंधार झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि गारपिट झाली. आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही भागात आजही गारपिटीची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा इशारा देण्यात आला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एप्रिल महिन्याला सुरूवात झाली पण पाऊस काही थांबत नाहीये.

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पावसामुळे शिरपूर बाजार समितीत शेतीमालाचे लाखोंचे नुकसान झाले. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्यांमुळे तीन दिवस बंद होते. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे हा शेतमाल भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जळगावच्या चोपड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालय. हाता तोंडाशी आलेल ज्वारीच पीक भुईसपाट झाले, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जातं आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागातील कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, रुई, मानोरी फाटा तसेच परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या कांदा, गहू व द्राक्ष पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in