• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ते 2 शब्द उच्चारताच अशोक खरातला पोलिसांनी धू-धू धुतला; पोलीस अटक करण्यासाठी गेले अन्…, खळबळजनक माहिती समोर

March 22, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एक- एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक व्हिडीओ समोर आले आहेत. खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केलं असून, सध्या त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याने पोलिसांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. ‘तुम्ही घोर अपमान करत आहात, तुमच्यावर कोप होईल’ असं काहीतरी खरात यावेळी बडबडत होता, अशी माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अशोक खरात याला अटक केली. दरम्यान यावेळी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच तो आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्याने थेट पोलिसांना विचित्र धमक्या देण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल’ असं यावेळी तो मोठं मोठ्यानं ओरडून पोलिसांना धमकी देत होता. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अशोक खरात याच्या मुसक्या आवळल्या, त्याला न्यायालयानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या अशोक खरात याच्या चौकशीमधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

पेन ड्राइव्ह जप्त

दरम्यान खरात याच्या कार्यालयातून पोलिसांनी एक पेन ड्राइव्ह जप्त केला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये आधी 58 व्हिडीओ सापडल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर तब्बल 100 पेक्षा अधिक व्हिडीओ आढळून आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने खरात याला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आपल्याला कोणाला अटक करायचं आहे? हे या कारवाईत सहभागी झालेल्या अनेक पोलिसांना शेवटपर्यंत माहितच नव्हतं, पोलिसांनी खरात याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता अतिशय शिताफिने त्याच्या मुसक्या आवळल्या.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानचा वाईट काळ सुरु, इस्लामाबादवर कोसळणार मिसाइल्स?
  • 20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका
  • पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत भाजपकडून मित्रांचीच शिकार… रोहित पवारांनी दिली पक्की बातमी, म्हणाले
  • Maharashtra News LIVE : बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग, सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार
  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in