• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ते नेहमी अजितदादांच्या सोबतच असायचे, पण विमान अपघाताच्या दिवशी का नव्हते? बड्या नेत्याच्या संशयानं मोठी खळबळ

February 9, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, मुंबईवरून प्रचारसभेसाठी बारामतीला येत असताना त्यांचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनिला धडकलं, त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर काही नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे. अमोल मिटकरी, यांच्यासह छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या अपघातावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे, सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले सोनवणे? 

देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवारांना होती. दादा येतील आणि भेटील असं सर्वांना वाटते. हा प्रसंग दुःखाचा आहे. मी संशय व्यक्त केला आहे, मी आरोप केला नाही. सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे, पुरावे देण्यासारखा विषय नाही. मी संशय व्यक्त केला आहे. याची चौकशी व्हावी असं मला वाटतं. झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना मी भेटणार आहे. अजितदादा माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, या अपघाताची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. कोणी आरोप करत नाही, सर्वजण शंका व्यक्त करतात तसा घटनाक्रम आहे, असं यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे.  अजित पवारांसोबत पीए का नव्हते?  नेहमी सोबत असणारे पीए कुठे गेले होते?  त्यादिवशी फक्त गार्ड सोबत होते, असा प्रश्न उपस्थित करतानाच  मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे,  मुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे. सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे, असंही यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in