• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्हाला सुद्धा सकाळी..सकाळी भरपूर पाणी पिण्याची सवय असेल तर सावधान…..

April 5, 2026 by admin Leave a Comment


आजकाल, दिवसाची सुरुवात कशी करावी यावर अनेक चर्चा होतात. काही लोक तांब्याच्या भांड्यातून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, तर काही जण चांदीच्या भांड्यातून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे निरोगी जीवनशैलीसाठी अत्यावश्यक आहे. शरीरातील सुमारे 60 टक्के भाग पाण्याचा असल्यामुळे त्याची योग्य पातळी राखणे गरजेचे ठरते. नियमितपणे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत राहते. याशिवाय, त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः उष्ण हवामानात किंवा शारीरिक श्रम अधिक असताना पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते, अन्यथा शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ शकते.

तथापि, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की पाणी अतिप्रमाणात पिणे देखील धोकादायक ठरू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण कमी होऊन ‘हायपोनेट्रेमिया’ नावाची स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे, मळमळ आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे व्यक्तीच्या वय, हवामान आणि शारीरिक हालचाली यानुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठरवणे आवश्यक आहे. साधारणपणे दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी पिणे योग्य मानले जाते, मात्र तहान लागल्यावर पाणी पिणे आणि दिवसभर थोड्या प्रमाणात पाणी घेत राहणे ही सवय अधिक फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पण सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी पिणे योग्य आहे का? पाणी पिण्याचे फायदे आहेत, पण सकाळी जास्त पाणी पिण्याची ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सकाळी सकाळी भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो?

पचनशक्ती

रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. सकाळी पचनशक्ती कमजोर असते आणि भरपूर पाणी प्यायल्याने ती जागृत होण्याऐवजी केवळ मंदावते. त्यामुळे, पचण्याऐवजी, नाश्त्याला खाल्लेले अन्न पोटातच सडू लागते.

बद्धकोष्ठता

दुसरे म्हणजे, अपचनामुळे पोटात विषारी पदार्थांची समस्या वाढते. शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता होऊ लागते.

जडपणा

तिसरी सर्वात मोठी समस्या ही आहे की सकाळी जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे पोटात जडपणा येतो आणि भूक लागत नाही. रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्याने वेदना होतात अशी तक्रारही अनेक लोक करतात.

सकाळी तहान लागल्यास पाणी कसे प्यावे?

आता प्रश्न असा आहे की काय करावे. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार आणि तेही थोड्या प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला जितकी तहान लागेल तितके कोमट पाणी प्या. सकाळी लवकर एक लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे पोटात जडपणा आणि उलट्या होऊ शकतात. जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. एकाच वेळी दोन लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करणे टाळा. तुमच्या रोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात थोडी वाढ करण्याचा प्रयत्न करा. नेहमी बसून आणि घोट घोट पाणी प्या. उभे राहून पाणी पिणे टाळा, कारण त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा, परंतु इतर ऋतूंमध्ये अति प्रमाणात पाणी पिणे टाळा. हिवाळ्यात दिवसभर कोमट पाणी पिऊ शकता, परंतु उन्हाळ्यात खोलीच्या तापमानाचे पाणीच प्यावे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in