
सापाला सर्वच जण घाबरतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडतात त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर दुसरा कोणताही उपचार त्याच्यावर न करता अशा व्यक्तीला तातडीने डॉक्टरकडे उपचयासाठी नेणे हाच एकमेव उपाय आहे. साप जरी विषारी असला आणि ज्या व्यक्तीला संर्पदंश झाला आहे, अशा व्यक्तीला वेळेत अँटी डोस मिळाला तर अशा रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला साप चावला असेल तर वेळ न घालवता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आहेत, मात्र त्यातील अवघ्या काही जातीच या विषारी आहेत. सापांच्या विषारी प्रजातीमध्ये फुरसे, मण्यार, नाग आणि घोणस या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. याला आपण बिग फोर असं देखील म्हणतो.
जर तुम्हाला कधी सर्पदंश झालाच तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका. अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला बिनविषारी साप चावलेला असतो, मात्र सर्पदंशानंतर तो व्यक्ती इतका घाबरून जातो की सापांच्या विषामुळे नाही तर तो घाबरल्यामुळेच त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे साप कोणताही असू द्या, विषारी, बिनविषारी तुम्ही धीर सोडू नका. तातडीने त्यावर वैद्यकीय उपचार घ्या. साप विषारी जरी असला तरी देखील तुम्हाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले तर तुमचा जीव वाचू शकतो.
आता प्रश्न असा की तुम्हाला चावलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी हे कंस ओळखायचं? त्यासाठी एक सोपी ट्रीक आहे. दुर्गम ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यात आजही या पद्धतीचा वापर चावलेला साप हा विषारी आहे की बनविषारी हे तपासण्यासाठी होतो. असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला विषारी साप चावला असेल तर त्या व्यक्तीच्या जीभेची संवेदना हळूहळू नष्ट होऊ लागते. म्हणजे त्याला कुठल्याही पदार्थांची चव लागत नाही, अशा वेळी ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, अशा व्यक्तीला लिंबाचा पाला किंवा तिखट मिरची खाण्यासाठी दिली जाते. जर त्या व्यक्तीने चवेला प्रतिसाद दिला तर तो साप बिनविषारी होता असं मानलं जातं. मात्र जर त्या व्यक्तीला कुठलीच चव लागत नसेल तर मात्र तो साप विषारी आहे, असं मानलं जातं.
या लेखाचा उद्देश तुम्हाला फक्त माहिती देणं हाच आहे, ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला आम्ही कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर यातील कुठलाही प्रयोग न करता, अशा व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे, हाच त्यावरील उपाय आहे, वैद्यकीय उपचार मिळाले तर अशा व्यक्तीचा जीव वाचू शकतो.
Leave a Reply