
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे गुणधर्म जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. सामान्यतः आपण हाताच्या रेषा, बोटांचा आकार किंवा राशीभविष्य यावरून व्यक्तिमत्वाचा अंदाज लावतो. मात्र, मानसशास्त्र आणि तज्ज्ञांच्या मते, तुमच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवरूनही तुमच्या स्वभावाचे पैलू उलगडू शकतात.
विशेषतः तुम्हाला आवडणारा आईस्क्रीमचा फ्लेवर तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. प्रत्येक व्यक्तीची चव वेगळी असते आणि त्यामागे त्यांची मानसिक जडणघडण असते. आज आपण आईस्क्रीमचे विविध फ्लेवर्सवरुन व्यक्तींचे व्यक्तीमत्व जाणून घेणार आहोत.
व्हॅनिला आईस्क्रीम हा सर्वात लोकप्रिय आणि साधा फ्लेवर मानला जातो. पण हा फ्लेवर आवडणारे लोक मुळीच साधे नसतात. हे लोक खूप स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांचे असतात.
त्यांना कोणाच्या दबावाखाली राहणे आवडत नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असतो. कोणत्याही विषयाची किंवा नात्याची त्यांना सखोल समज असते. ते थोडे भावूक असतात, ज्यामुळे ते इतरांच्या भावनांचा आदर करतात.
चॉकलेट आईस्क्रीम खाणारे लोक हे उत्साही आणि चैतन्यमय व्यक्तिमत्वाचे धनी असतात. हे लोक संवेदनशील असले तरी सर्वांशी खूप मोकळेपणाने आणि मैत्रीपूर्ण वागतात. हे नवीन लोकांशी लवकर जुळवून घेतात.
मात्र, जितक्या वेगाने ते नाते जोडतात, तितक्याच लवकर ते त्यातून बाहेरही पडू शकतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर जबरदस्त असतो. आपल्या बोलण्याने आणि विनोदाने ते कोणालाही सहज प्रभावित करतात.
गुलाबी रंगाचे हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आवडणारे लोक शांत स्वभावाचे असतात. हे लोक थोडे लाजाळू किंवा अंतर्मुखी (Introvert) असतात. त्यांच्याकडे कमालीचा संयम आणि सहनशीलता असते. कामाच्या बाबतीत ते अत्यंत प्रामाणिक असतात. एकदा हातात घेतलेले काम ते पूर्ण लक्ष देऊन आणि निष्ठेने पूर्ण करतात. त्यांच्याकडे भविष्याचा अचूक वेध घेण्याची किंवा परिस्थितीचे नीट आकलन करण्याची विशेष क्षमता असते.
कॉफी फ्लेवर आवडणारे लोक वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतात. हे लोक खूप आनंदी असतात आणि आयुष्य मजेत जगण्याला प्राधान्य देतात. त्यांना आधुनिकतेपेक्षा जुन्या परंपरा आणि साधी जीवनशैली जास्त भावते.
उत्साहाच्या भरात ते एकावेळी अनेक कामे हातात घेतात, पण अनेकदा ती अर्धवट सोडून देतात. जबाबदारी घेताना ते थोडे कचरतात, ज्यामुळे त्यांना कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो.
मिंट चॉकलेट चिप हा फ्लेवर आवडणाऱ्यांचे व्यक्तिमत्व थोडे आव्हानात्मक आणि शिस्तप्रिय असते. या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. ते चिकाटीने आणि जिद्दीने काम करतात. ते थोडे वाद घालणारे किंवा स्वतःचे मत ठामपणे मांडणारे असतात. त्यांना 'फायटर' म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांना भविष्याबद्दल स्पष्टता असते. प्रत्येक गोष्ट योजनेनुसार करण्यावर त्यांचा भर असतो. जरी ते बाहेरून रांगडे किंवा कठोर वाटत असले, तरी मनातून ते कधीकधी अत्यंत संवेदनशील असतात.









Leave a Reply