• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुझं शीर धडापासून वेगळं करू..; मोनालिसाच्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ म्हटल्याने दिग्दर्शकांना धमकी

March 12, 2026 by admin Leave a Comment


महाकुंभच्या वेळी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या लग्नावरून मोठा वाद सुरू झाला आहे. नुकतंच तिने मुस्लीम प्रियकर फरमान खानशी केरळातील कोर्टात लग्न केलं. तिच्या या निर्णयामुळे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना मोठा धक्का बसला आहे. सनोज यांच्याच चित्रपटातून मोनालिसा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे. सनोज यांनी मोनालिसा आणि फरमान यांच्या नात्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणत मॅनेजरनेच तिचा सौदा केल्याचा मोठा आरोप केला आहे. तिच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत बेधडक मतं मांडल्यानंतर आता सनोज यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.

याविषयी सनोज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘तुझं शीर धडापासून वेगळं करू, अशा धमका मला दिल्या जात आहेत. PFI ने (द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) कट रचून केरळमध्ये मोनालिसाचं लव्ह जिहाद केलंय.’ पीएफआय ही इस्लामिक राजकीय संघटना आहे. काहींनी कमेंट सेक्शनमध्ये असाही दावा केला आहे की फरमान हा पीएफआयचा कार्यकर्ता आहे. सनोज यांनी आधीच्या पोस्टमध्ये चित्रपट बनवताना त्यांना आलेल्या अडचणींचाही खुलासा केला होता. खोट्या प्रकरणात अडकवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanoj Mishra (@sanojmishra)

‘माझ्या आयुष्यातील हा सर्वांत वाईट दिवस आहे. हा लव्ह जिहाद आहे. आज मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि मी नैराश्यात गेलोय. जंगलात राहणारी गरीब कुटुंबातली मोनालिसा महाकुंभदरम्यान व्हायरल झाली होती. गंगेसारखी तिची पवित्रता आणि तिचं रुप पाहून मी तिला प्रशिक्षण देऊन चित्रपटात अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली होती. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. परंतु ही गोष्टी काही लोकांना रुचली नाही आणि खोट्या आरोपांखाली त्यांनी मला तुरुंगात पाठवलं. मी तुरुंगात राहून चित्रपटाची कथा लिहिली आणि चित्रपट पूर्ण करून दाखवला. मोनालिसाने आज जे पाऊल उचललं हे ते तिला बंडखोरी वाटत असेल, पण खरंतर हा लव्ह जिहाद आहे. ती लव्ह जिहादची शिकार बनली आहे’, असा आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी केला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in