• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?

April 13, 2026 by admin Leave a Comment


आजकाल प्रत्येक बँक खात्याचे व्यवहार ऑनलाइन होत असतात, त्यामुळे बँकिंगही सोपं झाल आहे. मात्र आता एकमा बॅकेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर या बँक अकाऊंटबद्दल एक मोठा अलर्ट समोर आला आहे. 16 एप्रिलपासून काही खाती बंद केली जाऊ शकतात, असा खरं इशारा बँकेने मार्चमध्ये दिला होता. ही अशी खाती आहेत जी तीन वर्षांपासून निष्क्रिय आहेत, त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यामधील शिल्लक ही शून्य आहे. जर तुमचं बँक खातं या कॅटॅगरीमध्ये येत असेल, तर पटापटा आवश्यक कारवाई करा, अन्यथा कोणत्याही सूचनेशिवाय हे बँक अकाऊंट बंद (PNB Account Close Alert) केलं जाईल आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते.

15 एप्रिलला डेडलाईन

पीएनबीच्या ज्या खातेधारकांनी गेल्या तीन वर्षांत कोणताही व्यवहार केलेला नाही आणि ज्यांच्या खात्यात कोणतीही शिल्लक अथवा निधी नाही, त्यांच्यासाठी 15 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या मुदतीपर्यंत ही बँक खाती ॲक्टिव्ह न केल्यास, ती बंद केली जातील. पंजाब नॅशनल बँकेने गेल्या महिन्यात, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला होता.

पीएनबीने एका एक्स-पोस्टद्वारे (पूर्वीच ट्विटर) सूचना जारी केली होती की, अशी निष्क्रिय खाती ठराविर वेळेत ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. मात्र असं केलं नाही तर 16 एप्रिल रोजी ही खाती निष्क्रिय करण्याची कारवाई केली जाईल. खाती ॲक्टिव्ह देखील सांगितली आहे. कशी करायची, त्याची प्रक्रिया देखील या सोशल मीडिया पोस्टमध्ये, बँकेने सांगितली आहे.

अस करा खातं पुन्हा ॲक्टिव्ह

पीएनबीचं असं खात पुन्हा ॲक्टिव्ह करणं खूप सोपं आहे. ज्यांचं या बँकेत अकाऊ्ंट आहे, ते खातेधारक 15 एप्रिलच्या डेडलाइनपूर्वी आपली खाती पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊ शकतात. तेथे जाऊन ‘नो युअर कस्टमर’ ((PNB KYC)) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवळ एक साधं केवायसी अपडेट पूर्ण करून किंवा व्यवहार पुन्हा सुरू करून खाते बंद होण्यापासून वाचवता येईल.

पीनएबी कडून ही कारवाई का ?

आता, पंजाब नॅशनल बँक अशी निष्क्रिय खाती बंद करण्याची कारवाई का करत आहे, हेही जाणून घेऊया. पीएनबीने आपल्या निवेदनात आधीच म्हटलं होतं की, या खात्यांशी संबंधित धोके कमी करणं हे यामागील कारण आहे. फसवणुकीच्या धोक्यामुळे, बँका अशा निष्क्रिय किंवा शून्य-शिल्लक खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ग्राहकांना त्यांच्या खात्याची स्थिती तपासण्यात काही अडचण आल्यास, त्यांनी त्यांच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in