• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ताटात अन्न नाही, गाडीत इंधन नाही… इफ्तार पार्टीवरही बंदी, थेट धक्कादायक निर्णय, पाकिस्तान सरकारने…

March 10, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम जगातील इतर देशांवर होत आहेत. गॅसचा प्रचंड मोठा तुडवटा जाणवत सुरू आहे. कच्चे तेल अनेक देशांमध्ये आयात होणे बंद आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा परिणाम गंभीर दिसून येत आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी व्यावसायिका सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असून आखाती देशाच्या रिफायनरीवर थेट हल्ले केले जात आहेत. काही देशांनी तेलाची रिफायनरी थांबवण्याचा निर्णय घेतला. मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्धणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाचा परिणाम आता शेजारील पाकिस्तानमधील दैनंदिन जीवनावर होत आहे. भारतात देखील सिलेंडरचे भाव वाढले. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. भारतात सध्याच्या घडीला गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.

पाकिस्तानमध्ये स्थिती अधिक गंभीर बघायला मिळत आहे. ऐन रमजानच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कतारवर गॅससाठी अवलंबून आहे. मात्र, इराणने कतार रिफायनरीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानात होणारी गॅसची आयात बंद आहे. पाकिस्तानकडे अजिबात गॅस शिल्लक नाहीये.

पाकिस्तान सरकारकडून अगोदरच शाळा, महाविद्यालय दोन आठवड्यांकरिता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासोबतच, अधिकृत जेवण आणि इफ्तार पार्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रमजानच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोन केले जाते. मात्र, आता पाकिस्तान सरकारकडून थेट इफ्तार पार्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तान सरकारने काढलेल्या या आदेशानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली. हे मोठे संकट असल्याचेही पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तान कायम अमेरिकेचे कान भरून देताना दिसतो. मात्र, आता इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट फटका अमेरिकेलाही बसताना दिसत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in