• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?

April 9, 2026 by admin Leave a Comment


कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यास त्यांच्याकडून दिला जाणारा एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे पाणी जास्त प्या…. पाणी प्यायल्याने अनेक आजार देखील दूर होताता आणि शारीरास मोठा फायदा होतो. अनेक जण ग्लासातून तर अनेक जण बाटलीतून पाणी पिताता. पण कोणत्या बाटलीतील पाणी योग्य आहे… याबद्दल फार कोणाला माहिती नसते. बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या बाटल्या आपण घरी आणतो. पण त्या आपल्या आरोग्यास योग्य आहेत की नाही, हे आपल्याला देखील माहिती नसते…

सांगायचं झालं तर, आपल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे… पण पाणी कसे प्यावे हे तुम्हाला माहीत आहे का? पाणी साठवण्यासाठी अनेक प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. सध्या, प्लास्टिकऐवजी तांब्याच्या आणि काचेच्या बाटल्या जास्त वापरल्या जातात. यापैकी आरोग्यासाठी काय चांगले आहे? तुम्हाला माहीत आहे का…

तांब्याची बाटली

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते असे म्हटले जाते. तांब्यामध्ये नैसर्गिक सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात, जे पाण्यातील काही जीवाणूंना मारण्यास मदत करू शकतात.

परंतु याचे काही तोटे आहेत. शरीरात अतिरिक्त तांबे गेल्यास विषबाधा होऊ शकते. पाणी जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यातून धातू बाहेर पडू शकतात. यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे, तांब्याच्या बाटल्या वापरता येत असल्या तरी, वेळ आणि प्रमाण यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

काचेची बाटली

काचेच्या बाटलीतून पाणी पिणे अधिक आरोग्यदायी असते. काच हा एक अक्रियाशील पदार्थ आहे. म्हणजेच, त्याची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही. गरम असो वा थंड, कोणत्याही प्रकारचे पेय काचेच्या बाटलीत सुरक्षितपणे साठवता येते. त्याच वेळी, काही अभ्यासांनुसार काचेच्या बाटल्यांच्या प्लास्टिकच्या झाकणांमधील सूक्ष्म प्लास्टिकचे कण पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे, सिलिकॉन किंवा धातूच्या झाकणांच्या काचेच्या बाटल्या निवडल्या जाऊ शकतात. त्यामुळे काचेच्या बाटलीतून पाणी पिणे योग्य ठरु शकेल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक
  • फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट
  • किचनच्या ‘या’ छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in