• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

… तर तुमचे गॅस कनेक्शन रद्द होईल, LPG ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! केंद्राचा मोठा निर्णय

March 26, 2026 by admin Leave a Comment


संपूर्ण देशातील LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले की, ज्या भागांमध्ये PNG (Piped Natural Gas) कनेक्शन उपलब्ध आहे आणि ते घरांपर्यंत पोहोचले आहे, त्या ठिकाणी लोकांनी PNG कनेक्शन घेणे अनिवार्य असेल. असे न केल्यास अशा घरांमध्ये 3 महिन्यांच्या आत LPG चा पुरवठा बंद केला जाईल. या निर्णयाचा उद्देश गॅस नेटवर्कचा विस्तार जलद करणे आणि एका इंधनावरची अवलंबित्व कमी करणे हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठ्यात अडथळे येत असल्याने भारताला LPG च्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकार घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पाइपद्वारे येणाऱ्या नैसर्गिक वायूकडे (PNG) वळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. PNG चा पुरवठा पाइपलाइनद्वारे थेट स्वयंपाकघरातील बर्नरपर्यंत सतत होत राहतो, त्यामुळे सिलेंडर रिफिल बुक करण्याची गरज राहत नाही.

अशातच आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश, 2026 जारी केला आहे. याचा उद्देश पाइपलाइन पायाभूत सुविधांचा विस्तार वेगाने करणे, मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे आणि ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी LPG ऐवजी PNG कडे वळण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे LPG वरील ताण कमी होणार आहे.

सरकारचा उद्देश काय आहे?

सरकारच्या या निर्णयाचा उद्देश अशा भागांमधून LPG चा पुरवठा कमी करणे आहे जिथे पाइपलाइन सुविधा उपलब्ध आहे आणि तो पुरवठा त्या भागांकडे वळवणे जिथे अशा सुविधा नाहीत. जागतिक पुरवठ्यातील अडथळे, होर्मुझ सामुद्रधुणीतील नाकेबंदी यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. यावर बोलताना तेल सचिव नीरज मित्तल यांनी म्हटले की, या सुधारांमुळे ‘संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.’ या आदेशाचा उद्देश मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, शुल्कांचे मानकीकरण करणे आणि ठराविक कालावधीत परवानग्या देणे हा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in