• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तब्बूचं वडिलांसोबत वैर… बापाचं नावही लावत नाही आणि भेटण्याची इच्छा नाही… अभिनेत्रीने सांगितंल हैराण करणारं कारण

February 1, 2026 by admin Leave a Comment


Tabu Personal Life: बॉलिवूड अभिनेत्री तबू हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. करीयरमध्ये तब्बू यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक चढ – उतारांचा समना केला. आज वयाच्या 54 व्या वर्षी देखील तब्बू एकटीच आयुष्य जगत आहे. तब्बू हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. एवंढच नाही तर, तब्बू हिला कधी वडिलांची साथ देखील लाभली नाही. तब्बू हिने कधी वडिलांचं नाव देखील लावलं नाही. एवढंच नाही, बापाला कधी भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली नाही.

तब्बू हिचं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे. पण तिची ओळख तब्बू म्हणूनच आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. तब्बू म्हणालेली, ‘माझं लहानपण फार आनंदात गेलं. हैदराबाद येथे मी मोठी झाली… आई – वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर मी आई – आजोबांकडे राहत होती… माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे अधिक वेळ मी माझ्या आजीसोबतच असायचे. आजी प्रार्थना बोलायला शिकवायची… अभ्यास घ्यायची आणि अशाच वातावरणात मी मोठी झाले. मी खूप घाबरायचे… मला माझा आवाजच नव्हता. पण अभिनेत्री झाल्यानंतर माझ्यात हिंमत आली…’

वडिलांचं नाव का नाही लावत तब्बू?

तब्बू हिचं अडनाव ‘हाशमी’ आहे… पण तिने कधीच वडिलांचं नाव स्वतःच्या नावापुढे लावलं नाही. तब्बू म्हणाली, ‘मी खरंच कधीच वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. मला कधी असं वाटलंच नाही की, वडिलांच्या नावाचा वापर केला पाहिजे… माझ्यासाठी, माझं नाव नेहमीच तबस्सुम फातिमा असं राहीलं आणि आहे. शाळेत फातिमा हे माझं आडनाव मानलं जात असे. मला वडिलांबद्दल काहीही आठवत नाही. माझी बहीण त्यांना अधूनमधून भेटली आहे, पण मला त्यांना भेटण्याची इच्छा कधीच झाली नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. ज्याप्रकारे मी मोठी झाली आहे, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात सेटल आहे आणि मला चांगलं वाटतं.’

तब्बू फक्त तीन वर्षांची असताना तिच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला. नंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. तब्बू हिला एक बहीण फराह देखील आहे, जी स्वतः एक अभिनेत्री होती. त्यानंतर तब्बू हिने देखील अभिनय विश्वात पदार्पण केलं. तिच्या कारकिर्दीची सुरुवात 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू सिनेमाने झाली. त्यानंतर 1994 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तब्बू हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ… निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’
  • Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?
  • Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बसणार आणखी एक मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी समोर
  • रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in