• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तब्बल 500 रुपयांचा गॅस फ्री… सरकारची सर्वात मोठी घोषणा; फक्त 24 तासांत…सामान्यांना सर्वात मोठं गिफ्ट!

March 25, 2026 by admin Leave a Comment


सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळूण इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने सुरुवातीला सर्व देशांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे एलपीसी गॅसचा तुटवडा भासू लागला होता. भारतात अनेक ठिकाणी सिलेंडर मिळणे बंद झाले होते. त्यामुळे सरकारने PNG कनेक्शनवर भर दिली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज सांगितले की, पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शनचे विस्तार करण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे. यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता हे निर्णय कोणते आहेत? चला जाणून घेऊया…

सरकारची मोठी घोषणा काय?

-नवीन पीएनजी कनेक्शनसाठी सिक्युरिटी फीस (सुरक्षा शुल्क) पूर्णपणे माफ करण्यात आली आहे.

-नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस देण्यात येणार आहे.

-दिल्लीमध्ये पीएनजी पाइपलाइन टाकताना रस्त्याची दुरुस्ती शुल्क देखील माफ करण्यात आले आहे.

-पाइपलाइनचे काम आता २४ तास (दिवस-रात्र) करता येणार आहे.

हे सर्व लाभ ३१ मार्च २०२६ पर्यंत नवीन पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध असतील.

एलपीजी पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण

सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कडक कारवाई सुरू आहे. २४ मार्च रोजी एका दिवसात २७०० छापे मारण्यात आले आणि २००० सिलेंडर जप्त करण्यात आले. अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलबाबत त्यांनी म्हटले की, सर्व रिफायनरीज पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. भारताकडे एकूण २६ कोटी टन रिफायनिंग क्षमता आहे.

पीएनजी विस्तारातील प्रगती

दिल्ली सरकारने पीएनजी कामांसाठी २४×७ परवानगी दिली आहे. गेल्या २५ दिवसांत देशभरात २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले आहेत. काल एलपीजी रिफिलसाठी ९२ टक्के बुकिंग ऑनलाइन झाली होती.

ट्रम्प यांचा मोदींना फोन

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, जागतिक नेत्यांसोबत भारताची चर्चा सुरू आहे. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला होता. तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचाही फोन आला. दोन्ही नेत्यांनी शिपिंग मार्ग सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. दुसरीकडे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल संध्याकाळी इराणच्या राजदूतांशी भेट घेतली आणि वेस्ट एशियातील सध्याच्या संघर्षावर चर्चा केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in