• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ढोंगीपणाचा कळस.. साध्वीचे भगवे वस्त्र सोडून ड्रेसमध्ये गोव्याच्या ट्रिपला निघाली अभिनेत्री, भडकले नेटकरी

March 20, 2026 by admin Leave a Comment


एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 2025 मध्ये महाकुंभदरम्यान अचानक प्रकाशझोतात आली. यावेळी तिने ग्लॅमरचं विश्व सोडून संन्यास घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाकुंभमध्ये ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. परंतु त्यानंतर झालेल्या वादामुळे तिला पदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासून ममता भगवे वस्त्र परिधान करून साध्वीचं आयुष्य जगत होती. आता अचानक पुन्हा एकदा तिचा बदललेला अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ममताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला जात असल्याचं सांगतेय.

भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा, चंदनाचा टिळा.. हे सर्व सोडून ममता आता वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहे. एअरपोर्टवरून तिने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये ती लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये पहायला मिळाली. गॉगल, लिपस्टिक, हलकंफुलकं मेकअप असा तिचा हा लूक होता. कुटुंबीय आणि मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला जात असल्याचं तिने या व्हिडीओतून चाहत्यांना सांगितलं. इतकंच नव्हे तर तिने घातलेल्या ‘मेटा एआय सनग्लासेस’ची किंमतसुद्धा तिने सांगितली आहे. हे सनग्लासेस 50 हजार रुपयांचे असल्याचं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamta_Kulkarni (@mamtakulkarniofficial____)

ममताचा हा एकंदर बदललेला अंदाज पाहून काही युजर्स भडकले आहेत. ‘साध्वी बनून मन भरल्यानंतर आता पुन्हा जुन्या अंदाजाच परतली आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘महामंडलेश्वर बनण्याचं भूत उतरलं वाटतं’, अशी खोचक टीका दुसऱ्या युजरने केली. ‘मॅडमचं साध्वीचं रुप कुठे गायब झालं?’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभमध्ये ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता. संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं. यावरून अनेकांनी तीव्र विरोध केला होता. ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंततर किन्नर अखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं होतं. महाकुंभच्या वेळी ममता तब्बल 25 वर्षांनंतर भारतात परतली होती. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं होतं. या सर्व घटनेवरून इतर साधूसंतांनी प्रश्न उपस्थित केले होते.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in