• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांनी हद्दच पार केली राव, श्रीलंकेवर मोठा दबाव, थेट इराणी सैनिकांना परत न…

March 7, 2026 by admin Leave a Comment


भारताच्या विशाखापट्टनम येथून युद्ध सराव पूर्ण करून इराणीची युद्धनाैका इराणच्या दिशेने निघाली असताना मोठा हल्ला अमेरिकेने केला. अमेरिकेच्या पाणबुडीने थेट इराणच्या युद्धनाैकेला धडक दिली, ज्यामध्ये 100 च्या जवळपास इराणी सैनिकांचा मृत्यु झाला. ही घटना श्रीलंकेच्या समुद्रहद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच श्रीलंकेने मदतकार्य राबवले. या हल्ल्यानंतर इराणकडून थेट इस्त्रायलमधील परमाणू केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. भारताच्या युद्ध सरावात फक्त इराणच नाही तर अनेक देश सहभागी झाले होते. युद्ध सराव करून ही युद्धनाैका इराणला जात होती, त्यावेळीच हल्ला करण्यात आला. अमेरिकेने ज्याप्रकारे इराणच्या युद्धनाैकेवर हल्ला केला, त्यानंतर जगात मोठी खळबळ उडाली. मात्र, आता अमेरिकेकडून श्रीलंकेवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात वाचलेल्या इराणी सैनिकांना परत इराणमध्ये न पाठवण्याकरिता अमेरिकेचा श्रीलंकेवर दबाव आहे.

युद्धनाैकेवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंकेला 32 इराणी सैनिकांना वाचवण्यात यश आले. इराणी आयआरआयएस देनाला टॉरपीडोने बुडवले. ज्यामध्ये 100 इराणी सैनिकांचा जीव गेला. ज्यावेळी या युद्धनाैकेवर हल्ला करण्यात आला, त्यावेळी युद्धनाैका शस्त्रांनी लेस होती. मात्र, अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वी कोणताही इशारा दिला नाही. अमेरिकेचे रक्षा मंत्री पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याला शांत मृत्यु असे नाव दिले.

या हल्ल्यात वाचलेल्या इराणी सैनिकांना कोलंबो येथे नाैसेनेच्या कार्यालयात ठेवण्यात आले. काहींवर उपचार सुरू आहेत. या इराणी सैनिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची तयारी श्रीलंकेकरून सुरू असतानाच अमेरिकेने दबाव टाकत थेट म्हटले की, जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत श्रीलंकेने या सैनिकांना आपल्यात ताब्यात ठेवावे.

मात्र, श्रीलंकेने स्पष्ट म्हटले की, व्दिपीय देश असल्याने या युद्धनाैकेवरील वाचलेल्या सैनिकांना त्यांच्या देशाच्या ताब्यात देणे ही आमची जबाबदारी आहे. यादरम्यानच हॉवेल भारत आणि श्रीलंकाचे इस्त्रायलचे राजदूत यांनी स्पष्ट केले की, या इराणी सैनिकांना परत पाठवण्याची कोणतीही योजना नाही. आता श्रीलंका नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in