• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात 1 तास फोनवर चर्चा, थेट मोजतबा खामेनेई यांची..

March 10, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका सर्वच देशांना बसत आहे. आता हे युद्ध तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही. जगातील सर्वच देश या युद्धात भरडले जात आहेत. अमेरिकेने मोठा आरोप करत म्हटले होते की, रशिया इराणला मदत करत असून सिक्रेट डेटा रशियाने इराणला दिला. यादरम्यान इराणच्या नव्या सर्वाेच्च नेत्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याला आम्ही इराणचा सर्वाेच्च नेता मानत नाहीत. मोजतबा खामेनेई इराणचा सर्वाेच्च नेता राहू शकणार नाही. मात्र, यादरम्यान रशियाकडून मोजतबा खामेनेई याला सर्वाेच्चपद मिळाल्यानंतर रशियाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. व्लादिमीर पुतीन यांनी अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध अधिक घातक होत चालले असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जवळपास एक तास फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्या मते, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इराण युद्ध त्वरित थांबवण्याबद्दल चर्चा केली आणि हे युद्ध थांबवण्याचा प्लॅनही सांगितला.

व्लादिमीर पुतिन यांचे राजनैतिक सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, डिसेंबरनंतरच्या पहिल्या बोलण्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि ट्रम्प यांच्यासोबत 1 तास फोनवर चर्चा केली. इराणसोबतचे युद्ध थांबवण्यावर भर दिला. यादरम्यान युक्रेनसोबतच्या युद्धावरही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात रशियावर आरोप केली जात असतानाच आता दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. इराणकरिता रशिया मैदानात येणार असल्याचे सांगितले जात होते. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध सर्वात अगोदर रशियाकडूनच करण्यात आला. इराणमधील स्थिती भीषण असून मोठा कहर इराणमध्ये बघायला मिळत आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा थेट फटका आखाती देशांना बसल्याचे दिसत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in